शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

‘फलकबाजां’वर कारवाईचे संकेत

By admin | Updated: February 23, 2016 02:51 IST

बेकायदेशीरपणे होर्डिंग लावून शहराचा चेहरा विद्रुप करणाऱ्यांना गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. असे असतानाही शिवजयंतीनिमित्त बेकायदेशीर

मुंबई : बेकायदेशीरपणे होर्डिंग लावून शहराचा चेहरा विद्रुप करणाऱ्यांना गेल्याच आठवड्यात उच्च न्यायालयाने २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. असे असतानाही शिवजयंतीनिमित्त बेकायदेशीर होर्डिंग झळकली होती. सोमवारी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना या सर्वांची नावे सादर करण्याचे निर्देश देत, यांच्यावरही न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करू, असे स्पष्ट संकेत दिले. बेकायदेशीररीत्या होर्डिंग लावल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशीष शेलार, विलेपार्ले येथील आमदार पराग अळवणी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष कार्यकर्ते आणि विकासक सचिन गुंजाळ यांना दंड ठोठावला, तसेच अन्य १२ पक्ष कार्यकर्त्यांना २० हजार रुपयांचा दंड सुनावला. शहराचा चेहरा विद्रुप करणाऱ्यांपर्यंत योग्य तो संदेश जावा, यासाठी हा दंड ठोठावण्यात येत असल्याचे न्या. अभय ओक व न्या. सी. व्ही. भडंग यांनी दंड ठोठावताना स्पष्ट केले होते. असे असतानाही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवजयंती, वाढदिवस व इतर कार्यक्रमांनिमित्त बेकायदेशीर होर्डिंग्ज लावली. (प्रतिनिधी)शुभेच्छुकांची नावे सादर कराही बाब सुस्वराज्य फाउंडेशनतर्फे त्यांचे वकील उदय वारुंजीकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर खंडपीठाने होर्डिंगवरील सर्व शुभेच्छुकांची नावे पत्त्यांसह सादर करा, असा आदेश देत, या सर्वांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले. सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशनने बेकायदेशीर होर्डिंग्जविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने या याचिकेची व्याप्ती वाढवत, ती संपूर्ण राज्यासाठी लागू केली.