शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेचे भरीव योगदान

By admin | Updated: May 28, 2017 01:02 IST

आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रात घेतलेल्या वॉटर कप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने ४९० पोकलेन आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने ३३६ गावे पाणीदार बनविण्यात

- लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनने महाराष्ट्रात घेतलेल्या वॉटर कप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने ४९० पोकलेन आणि जेसीबी मशिनच्या साहाय्याने ३३६ गावे पाणीदार बनविण्यात भरीव योगदान दिले आहे. एकाच वेळी विविध गावांत या यंत्रांची गरज भागविताना भारतीय जैन संघटनेला आपला आपत्ती निवारण काळातील अनुभव उपयोगाला आला, अशी माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली. या वर्षी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ३० तालुक्यांतील गावांचा समावेश होता. भारतीय जैन संघटनेने या स्पर्धेत श्रमदानाचा टप्पा पूर्ण करणाऱ्या सर्व गावांतील कठीण कामे जेसीबी आणि पोकलेनच्या माध्यमातून करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. यासाठी ३० तालुक्यांत ४२ लोकांच्या नियुक्त्या करून सर्व सरपंचांशी व गावकऱ्यांशी संपर्क करण्याची यंत्रणा उभी केली होती. तसेच प्रत्येक जिल्ह्यात भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समित्याही नियुक्त केल्या होत्या. एक वेगळे सॉफ्टवेअर बनवून काम करण्यास सुरुवात करण्यात आली. अनेक अडीअडचणींचा सामना करीत स्पर्धा संपण्याच्या दिवसापर्यंत जेसीबीने एकूण २७१ आणि २१९ पोकलेनद्वारे ३३६ गावांत मोठ्या प्रमाणावर कामे केली. सुरुवातीला एका गावाला २५० तास जेसीबी आणि १०० तास पोकलेन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्ष सरपंचांच्या बैठकीमध्ये सर्वच गावांची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने अनेक गावांना वेळ आणि मशिन्स वाढवून द्यावे लागले, असेही केतन शहा यांनी सांगितले. या वेळी श्याम पाटील, अमोल हांडगे, वालचंद पाटील, राकेश हेरलगे, अभिनंदन विभुते, संजय लोंढे, वर्षा जैन, संजय भस्मे, माया पाटील, अरुण नानर, पंकजा पंडित आदी उपस्थित होते. मध्य प्रदेशातून मागविण्यात आल्या जेसीबी...एप्रिल व मे या कालावधीत जेसीबी व पोकलेनसारख्या मशिन्स मिळविणे अवघड होते. मराठवाड्यात बीड, उस्मानाबाद येथे त्रास झाला. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या आदिवासी भागात मशिन उपलब्ध होत नव्हते. गरज लक्षात घेऊन मध्य प्रदेशातील खांडवा भागातून जेसीबी आणि पोकलेन आणून आदिवासी परिसरात दुष्काळाची कामे करून देण्यात आली. मागास व दुर्गम गावांना डिझेलसह मशिन्स दिल्या...शांतिलाल मुथा आणि प्रफुल्ल पारख यांच्या दौऱ्यात काही गावांचे लोक डिझेलचे पैसे देण्यास असमर्थता व्यक्त करीत होते. आमीर खान यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चारमोळी गावाला भेट दिली असता त्या गावातील वृद्ध महिलांनी मासिक पेन्शनमधून ५00 रुपये डिझेलसाठी आमीर खान यांच्यासमोर देऊ केले होते. त्यामुळे आमीर खानने अशा गावांची यादी गोळा करून शांतिलाल मुथ्था यांच्यासोबत गावांना डिझेलसह मशिन देण्याबाबत चर्चा केली. त्यानुसार भारतीय जैन संघटनेने ३१ गावांना ३६ मशिन्स डिझेलसह पुरविल्या आहेत, अशी माहिती या वेळी केतनभाई शहा यांनी दिली.