शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भारत विश्वमांगल्याची राजधानी व्हावी

By admin | Updated: December 25, 2016 01:24 IST

देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे.

नागपूर : देशाच्या सीमेवर भाषा, धर्म, पंथ यांना भेदून सैनिक आपल्या जीव धोक्यात घालून देशाचे व समाजाचे रक्षण करीत आहेत. सैनिकांची ही भावना विश्वमांगल्याची आहे. परंतु समाजानेही सैनिकांचे समर्पण लक्षात घेतले पाहिजे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजात सन्मानाची भावना रुजविण्याचे काम झाल्यास, भारत विश्वमांगल्याची राजधानी होईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली.देशरक्षक आणि धर्मरक्षक यांच्या प्रेरणा संगमातून राष्ट्रक्रांतीचे बीजारोपण करणारा प्रेरणा संगम हा कार्यक्रम धर्मसंस्कृती महाकुंभात आयोजित केला होता. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आदर व्यक्त करण्यास एक प्रेरणादायी संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. ज्योतिषपिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सरसंघचालक मोहन भागवत होते. त्याचबरोबर सेनेचे जनरल अ‍ॅडमिरल निर्मलचंद वीज, लेफ्टनन्ट जनरल सय्यद अता होस्नेन, हवाई दलाचे एअर मार्शल भूषण गोखले, लेफ्ट. कर्नल जी.एस. जॉली, लेफ्ट. कर्नल सुनील देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात १५० वीरपत्नी, वीरमातांचा सत्कार तसेच विशेष पदक प्राप्त अधिकारी आणि शौर्य गाजविलेल्या सैनिकांचा गौरव या करण्यात आला. (प्रतिनिधी)सीमेवर बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सन्मान, सुविधा मिळावी, सैनिकांचा आदर देश व समाजाने कायम ठेवावा. समाजाची सैनिकांप्रती कर्तव्याची भावना असल्याची जाणीव व्हावी, अशी समाज व सरकारकडून अपेक्षा आहे. - जनरल अ‍ॅडमिरल निर्मलचंद वीजमहाराष्ट्रात गेल्या वर्षात ८५०० भागवत कथा संपन्न झाल्या. यात कथाकार व आयोजकांचा सन्मान झाला. परंतु ज्या परिसरात हे आयोजन झाले, त्या परिसरातील सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान झाला असता, तर एक मोठे कार्य घडले असते. ही भावना समाजात निर्माण होणे गरजेचे आहे.- आचार्य जितेंद्रनाथ महाराजसंत व सैनिक दोन्ही संन्यासी आहेत. दोघेही देशाचे संरक्षक आहे. त्यामुळे संत आणि सैनिकांबद्दल समाजामध्ये आदराची भावना असणे गरजेचे आहे. विश्वमांगल्याच्या भावनेतून हे कार्य घराघरात पोहचविण्याचे कार्य संत संप्रदायाबरोबरच आता स्वयंसेवकांनीही हाती घेतले आहे. - ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्यस्वामी वासुदेवानंद सरस्वती