शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ ही जनसामान्यांची मागणी

By admin | Updated: December 19, 2015 02:00 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह

औरंगाबाद : स्वतंत्र विदर्भ राज्य ही ९७ टक्केजनसामान्यांची मागणी आहे. मुंबईसाठी बलिदान केलेल्या १०५ हुतात्म्यांबद्दल मला आदरच आहे. मात्र, स्वतंत्र विदर्भासाठीचा माझा सत्याग्रह हा वैयक्तिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनायक बापूजी अणे यांचीही हीच भूमिका होती, असे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्पष्ट केले.चार आयोगांनी आपल्या अहवालात स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती. कायदेशीर मार्गानेच स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न सोडविला जावा, राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करूनच ही प्रक्रिया व्हावी, अशी माझी आग्रही भूमिका आहे, असे अणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते एका याचिकेच्या सुनावणीसाठी औरंगाबादला आले होते.सेनेची भूमिका अधिवेशनापुरतीच होती काय, या प्रश्नावर अणे म्हणाले की, अधिवेशन हे एक निमित्त होते. ती भूमिका त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा भाग आहे. वेगळ््या विदर्भाला सेनेचा दीर्घकाळापासून विरोध आहे.स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती ही आर्थिकदृष्ट्या योग्य असेल काय, या प्रश्नाला उत्तर देताना अणे म्हणाले की, इंग्रज देश सोडून गेले तेव्हा तसेच पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन एकापेक्षा अधिक राज्यांची निर्मिती झाली, तेव्हासुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला नाही. स्वतंत्र राज्य का नको, यासाठी या मुद्याचा वापर केला जातो. जनमत विचारात घेऊन कायदेशीर प्रक्रियेद्वारे, शांततेच्या मार्गानेच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती व्हावी, अशी आमची भूमिका आहे. (प्रतिनिधी)सलमान खान प्रकरणी आव्हान देणार का?अभिनेता सलमान खानबाबतच्या निकालाविरुद्ध राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे काय, असे विचारले असता अणे म्हणाले, उपरोक्त प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. त्याबाबत सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकले जाईल. नंतर हे प्रकरण गृह आणि विधी व न्याय विभागाकडे पाठविल्यानंतर महाधिवक्त्यांकडे अभिप्रायासाठी पाठविले जाते. ही प्रक्रिया होण्यासाठी जवळपास दोन-तीन महिने लागतात. प्रकरण महाधिवक्त्यांकडे पाठविणे बंधनकारक नाही. ती एक प्रथा आहे, असे अणे म्हणाले.