शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीसाठी स्वतंत्र यंत्रणा

By admin | Updated: May 18, 2016 05:10 IST

जात पडताळणीसाठीची हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याची सातत्याने ओरड होत असताना आता या कामासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभारण्याचा निर्णय

मुंबई : जात पडताळणीसाठीची हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याची सातत्याने ओरड होत असताना आता या कामासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यासाठी ११५ पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्षांची पदे अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच समाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखालील अतिरिक्त आयुक्त किंवा मंत्रालयीन विभागाच्या सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांमधून भरण्यास मान्यता देण्यात आली.सिंचनाचे पाणी पाइपलाइनने पुरविणारसिंचनासाठीच्या पाण्याचा जास्तीतजास्त वापर व्हावा आणि ते वाया जाऊ नये यासाठी त्याचा पुरवठा पाइपलाइनने करण्याच्या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. केवळ लघुवितरिका व पाटचाऱ्यासाठी पाइपलाइन वापरल्यास अंदाजे २५ टक्के पाणीबचत होऊ शकते. पाइपलाइनमुळे पाण्याचे संतुलित वाटप करणेदेखील सुलभ होते. तसेच या प्रणालीसाठी भूसंपादनाची गरज नसून शेतकऱ्यांना मशागत करण्यास कोणताही अडथळा निर्माण होत नाही, असे समर्थन या धोरणात करण्यात आले आहे. आज कालव्यांद्वारे पाणी पुरविण्याच्या पद्धतीमुळे पाणी शेतात पोहोचेपर्यंत त्यात बरीच घट होते. या पार्श्वभूमीवर पाइपलाइनने पाणीवाटपाचा इलाज समोर आला आहे. पाइपलाइनने पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर तीन वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराची असेल. पाणी वापर संस्था निर्माण करणे आवश्यक असेल. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि चार अन्य सदस्य असतील. प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्य सचिव किंवा समकक्ष किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतील. प्राधिकरणाचे सदस्य म्हणून जलसंपदा अभियांत्रिकी, अर्थव्यवस्था, भूजल व्यवस्थापन आणि विधि व न्याय क्षेत्रातील प्रत्येकी एका तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. (विशेष प्रतिनिधी)