शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरचे १८०० शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: July 4, 2016 01:40 IST

सन २०१३-१४ व २०१४-१५मध्ये इंदापूर तालुक्यातील ५८०० शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी प्रस्ताव देण्यात आले होते.

लासुर्णे : सन २०१३-१४ व २०१४-१५मध्ये इंदापूर तालुक्यातील ५८०० शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी प्रस्ताव देण्यात आले होते. यापैकी कृषी विभागाने शासनाच्या दिलेल्या अपुऱ्या निधीमुळे तालुक्यातील फक्त ४००० प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे तालुक्यातील १८०० शेतकरी अजूनही ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित राहिल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर आहे. सध्या सर्वत्रच दुष्काळाचे सावट असल्याने ‘पाणी वाचवा ठिबक सिंचनाचा वापर करा’ अशी घोषणा शासन करत आहे. परंतु इंदापूर तालुक्यात शासनाने पाठविलेला निधी कमी पडल्यामुळे १८०० शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिल्याचे ‘लोकमत’ पाहणीत समोर आले आहे. इंदापूर तालुक्यातील सन २०१३-१४मध्ये ४२०० शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले होते. यापैकी ३००० प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सन २०१४-१५मध्ये १६०० शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिले होते. यापैकी १००० प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते. सध्या १८०० शेतकरी ठिबक सिंचनाच्या अनुदानापासून वंचित राहिले आहेत. मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ठिबक सिंचन अनुदान अशा घोषणा करून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ठिबक सिंचन अनुदान अशा घोषणा करून शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारण शासन २५ बाय ३० फूट जागेच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये अनुदान देते. परंतु, यासाठी जमीन जर कडक लागली तर एक लाखापर्यंत खर्च येतो. तसेच, ठिबक सिंचनासाठी एकरी पस्तीस ते चाळीस हजार रु. खर्च येतो. परंतु, शासन सतरा ते अठरा हजारच अनुदान देते. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शासनाच्या सवलतीचा फायदा घेता येत नसल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)