शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

सौर कृषी पंप योजनेला वाढता प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 00:08 IST

पश्चिम वऱ्हाडातील चित्र : चौदाशे शेतकऱ्यांनी भरले पैसे

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यातील शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत असल्याचे चित्र पश्चिम वऱ्हाडात दिसत आहे. सुरुवातीला जाचक अटींमुळे याकडे पाठ करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभत असल्यामुळे या योजनेसाठी तीन जिल्ह्यांतून १ हजार ४०७ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. चार महिन्यांपूर्वीच्या तुलनेत यात ३० टक्के वाढ झाली आहे.सौर ऊर्जा हा प्र्रकार अपारंपरिक ऊर्जा स्रोत असलेल्या स्रोतांपैकी शाश्वत स्रोत असल्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी सौर कृषी पंप देण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३.५ अथवा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप केंद्र शासनाच्या ३० टक्के, तर राज्य शासनाच्या पाच टक्के अनुदानासह ६० टक्के कर्ज आणि उर्वरित पाच टक्के शेतकरी हिस्सा या स्वरूपात वितरित करण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अल्पभूधारक आणि दुर्गम भागात शेती असलेला अर्थात ज्या ठिकाणी सहजतेने वीज उपलब्ध होऊ शकत नाही, अशा भागातील शेती असलेला असणे आवश्यक आहे. त्याशिवाय या योजनेचा फायदा घेण्यासाठी कर्ज मंजुरीसह इतर काही जाचक अटींमुळे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास उत्सुक नव्हते. त्यामुळे दुर्गम भागामधील आणि अल्पभूधारक शेतकरी या अटी वगळता शासनाने इतर काही अटी शिथिल केल्यानंतर या योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला. या योजनेत अकोला जिल्ह्यासाठी एक हजार पंपांचे उद्दिष्ट असताना १२०१ शेतकऱ्यांना मागणी पत्र देण्यास सांगण्यात आले. त्यापैकी ४५५ शेतकऱ्यांनी पाच टक्के हिस्सा भरला. बुलडाणा जिल्ह्यात १६६५ उद्दिष्ट असताना ८८३ शेतकऱ्यांना मागणी पत्र सादर करण्यास सांगितल्यानंतर ५०६ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्शाची रक्कम भरली, तर वाशिम जिल्ह्यात १ हजार ३०० उद्दिष्ट असताना ९५७ शेतकऱ्यांना मागणी पत्र सादर करण्यास सांगण्यात आले. त्यातील ४४६ शेतकऱ्यांनी पैसे भरले. आतापर्यंत या योजनेत अकोला जिल्ह्यात ३०५, बुलडाणा जिल्ह्यात ३७७, तर वाशिम जिल्ह्यात २४८ कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत.