शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत रावण दहनासाठी प्रेक्षकांची वाढती गर्दी

By admin | Updated: October 11, 2016 18:26 IST

येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६२ वर्षांची परंपरा असून मंगळवारी ग्रामीण भागातील लोकांची दुपारीच प्रदर्शनीत गर्दी होती. तर सायंकाळच्या सुमारास रावण दहन

ऑनलाइन लोकमतहिंगोली, दि. 11 -  येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची १६२ वर्षांची परंपरा असून मंगळवारी ग्रामीण भागातील लोकांची दुपारीच प्रदर्शनीत गर्दी होती. तर सायंकाळच्या सुमारास रावण दहन पाहण्यासाठी येणाऱ्यांची गर्दी होताना दिसत होती.हिंगोलीतील ऐतिहासिक दसरा महोत्सवासोबतच येथील प्रदर्शनी शहरी व ग्रामीण भागातील जनतेसाठी आकर्षण असते. दररोज गावोगावातून नागरिक जणू यात्रा उत्सवाप्रमाणे या प्रदर्शनीत भेट देण्यासाठी येत असतात. दसऱ्याच्या मुहुर्तावर तर बाजारपेठेत खरेदीसह प्रदर्शनीतही भेट दिली जाते. त्यामुळे दुपारपासूनच प्रदर्शनीत पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंतही असेच चित्र होते. त्यानंतर काहीकाळ गर्दी थोडी कमी झाली की, पुन्हा लोंढेच्या लोंढे दाखल होत होते. त्यातही प्रदर्शनीचा आनंद घेतल्यानंतर रावण दहनाला हजेरी लावण्याच्या उद्देशाने येणाऱ्यांची संख्या मोठी होती. जिल्ह्यातीलच नव्हे, तर परजिल्ह्यातील मंडळीही यात मोठ्या संख्येने होती. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये येथील रावण दहनानिमित्त होणारी आतषबाजी आकर्षणाचा विषय असते. यंदा ११.४५ चा रावण दहनाचा मुहुर्त असल्याने जिल्ह्यातील मंडळी मात्र उशिराने दाखल होईल, असे दिसते.

कोट्यवधींची उलाढालहिंगोली येथील दसरा महोत्सवातील प्रदर्शनी आणखी दोन ते तीन दिवस चालणार आहे. मात्र मागील काही दिवसांत कोट्यवधीची उलाढाल झाली. त्यातही सलग सुट्यांमुळे प्रदर्शनीत मोठी गर्दी होत असून यंदा प्रदर्शनीतील व्यावसायिकांची चांदी झाली आहे. झोके, चक्री, मौत का कुंंआ, पन्नालाल शो, लहान मुलांचे पाळणे व इलेक्टॉनिक झुले, महिलांची आभूषणे, खेळणी, खाद्यपदार्थ, कोल्ड्रिंक्स आदींच्या दुकानांवर यंदा मोठी गर्दी दिसून येत आहे.