शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत वाढली अनधिकृत बांधकामे

By admin | Updated: March 6, 2017 00:39 IST

अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत तीन-चार निवडणूक लढल्या गेल्या. त्यावर तोडगा निघाला नाही

पिंपरी : अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा, शास्ती रद्दच्या निर्ण़याविषयी संभ्रम आहे. अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत तीन-चार निवडणूक लढल्या गेल्या. त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली. राजकीय पक्षाचे कोणीच विरोध करणार नाहीत, उलट त्यांच्या आशीर्वादाने निवडणूक कालावधी हीच संधी मानून नागरिकांनी बांधकामे केली आहेत. राज्यातील अन्य महापालिका आणि शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराचा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा जटिल बनला आहे. दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल असल्याने पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामप्रश्नी सर्वांचे लक्ष वेधले आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या काळात न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहीम अधिक तीव्रपणे राबवली गेली. आठ हजार चौरस फुटांची बांधकामे जमीनदोस्त झाली. नदीपात्रातील शाळेच्या इमारतींनाही झळ पोहोचली. अनधिकृत बांधकामांविरोधात तीव्र मोहीम राबवतात, म्हणून परदेशी यांची मुदतपूर्व बदली करण्यासाठी काही राजकारण्यांनी कंबर कसली. राजकीय दबावतंत्र वापरून त्यांची बदली झाली. झालेल्या अनधिकृत बांधकामावर तोडगा निघेल, परंतु निदान यापुढे ती होऊ नयेत, याची दक्षता घेण्याची जबाबदारी महापालिका प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधींची आहे, असे त्यांचे मत होते. महापालिका सभागृहात चर्चेवेळी अनधिकृत बांधकामांना जबाबदार कोण, असा मुद्दा उपस्थित व्हायचा. अधिकारी-लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप करीत होते. मात्र अद्याप शास्तीकराचा विषय निकाली निघालेला नाही. (प्रतिनिधी)।नव्याने बांधकामे निवडणूक काळात झाली. त्या वाढीव बांधकामांनाही शास्ती माफ होणार असेल, तर बांधकाम परवाना विभागात रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करणारे मूर्ख ठरू लागले आहेत. सवलत, माफी योजना, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी असतील, तर नियमात काम करणाऱ्यांच्या दृष्टीने असे धोरण अन्यायकारक ठरणारे आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.