शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

चारही आरोपींच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: May 18, 2016 05:18 IST

शीना बोरा हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली

मुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली, तर श्यामवर राय याच्या ‘माफीचा साक्षीदार’ होण्याच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी विशेष न्यायालयाने सीबीआयला ६ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. गेल्याच आठवड्यात शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने ‘माफीचा साक्षीदार’ करण्यात यावे, यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सीबीआयने मंगळवारच्या सुनावणीत विशेष न्यायालयाकडून मुदत मागितली. त्यावर विशेष न्यायालयाने सीबीआयला ६ जूनपर्यंत मुदत दिली, तर इंद्राणी मुखर्जी, श्यामवर राय, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्या न्यायालयीन कोठडीत ६ जूनपर्यंत वाढ केली.राय याने गेल्या आठवड्यात न्यायालयाला दोन पानी पत्र लिहिले. या पत्रात त्याने शीना बोरा हत्याप्रकरणाची संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्याऐवजी आपल्याला शिक्षेत दया दाखवण्यात यावी, अशी विनंती त्याने न्यायालयाला केली. या संदर्भात न्यायालयाने सीबीआयला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सीबीआयने आपल्याला आणखी काही दिवसांची मुदत मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने सीबीआयला ६ जूनपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)