शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’मुळे गावोगावी पाणीसाठ्यांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2016 01:54 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण

- समीर देशपांडे, कोल्हापूर

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नोव्हेंबर २०१६ अखेर ११३ किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यातून ३७ लाख ४५ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. कोल्हापूरची पाणीपातळी चांगली असल्याने, या कामाला सातारा आणि सांगली जिल्ह्यांत चांगला वाव असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.गेल्या वर्षीपासून जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात करण्यात आली. सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण करीत, ‘पाणी अडविणे, पाणी जिरविणे’ या कामांना प्राधान्य देत कधी नव्हे ते गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिले गेले. त्यामुळे गावोगावी वेगवेगळी कामे हाती घेण्यात आली. परिणामी, अनेक गावांमध्ये पाणीसाठ्यांत वाढ झाली, तर काही ठिकाणी पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गतवर्षी पाऊस लांबला होता, त्यामुळे गाळ काढण्याच्या मोहिमेने गती घेतली होती. यंदा या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील २१०, सांगली जिल्ह्यातील १४०, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २० गावे निवडली आहेत. या एकूण ३७० गावांपैकी २६० गावांमध्ये लोकसहभागातून कामे सुरू झाली आहेत. कामांची एकूण संख्या ७९२ असून, त्यातील ४५२ लोकसहभागाची व ३४० शासकीय कामे आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत १२ कोटी ५५ लाख रुपयांची ही कामे झाली आहेत.राजस्थानचे पथक पाहणीसाठी येणारकोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्रात झालेले काम पाहण्यासाठी, तसेच कृषी योजनांचा आढावा घेण्यासाठी राजस्थानचे ग्रामविकासमंत्री राजेंद्रसिंग राठोड यांच्यासह ३० जणांचे पथक ४ आणि ५ जानेवारीला येत आहे. सिद्धिविनायक व साई संस्थानकडून निधीमुंबई येथील श्री सिद्धिविनायक ट्रस्ट व श्री साईबाबा संस्थान, शिर्डी या दोन देवस्थानांनी जलयुक्त शिवारसाठी देणगी दिली होती. त्यातील सुमारे चार कोटी रुपयांचा निधी हा कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांना मिळाला आहे. त्यातून या दोन जिल्ह्यांत ८६ कामे सुरू करण्यात आली आहेत.