शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

भातसा, बारवी प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ

By admin | Updated: July 9, 2016 17:59 IST

भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे

ऑनलाइन लोकमत - 
ठाणे, दि. 09 - भातसा, बारवी या मोठ्या प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली असून तुलनेने या क्षेत्रात उत्तम पाउस झाला आहे असे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून समजते. भातसामध्ये सध्या ४१.०१ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी याच सुमारास ते ३६.३५ टक्के होते. बारवी मध्ये सध्या ३३.५३ टक्के पाणी आहे . गेल्या वर्षी ते याच सुमारास २३.८० टक्के इतके होते. गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत बऱ्याच प्रकल्पांत यंदा चांगला पाणीसाठा हे असे दिसते. 
 
टाटा कंपनीकडील पुणे जिल्ह्यातल्या आंध्र प्रकल्पात मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी म्हणजे १३.३२ टक्के पाणीसाठा आहे. याठिकाणी गेल्या वर्षी २०.६३ टक्के पाणी होते.  लघू प्रकल्पापैकी जांभे, डोळखांब, आदिवली या शहापूर तालुक्यातील तर अंबरनाथ मधील भोज आणि मुरबाड तालुक्यातील घसाई आणि पाडाळे या प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. मुसई, जान्भूर्डे, उसगाव, जांभिवली या प्रकल्पांतही पावसामुळे चांगला पाणीसाठा झाला आहे. 
 
पालघर जिल्ह्यातील धामणी या मोठ्या प्रकल्पात ३९.७७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो ३६.४४ टक्के होता. तर कवडास मध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.  बृहन्मुंबई मनपाकडे असलेल्या २२.३० इतका तर तानसा मध्ये ३२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या दोन्ही तलावांमध्ये अनुक्रमे ४२.६३ आणि १८ टक्के इतका पाणीसाठा होता. गेल्या वर्षीपेक्षा या वेळेस धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याचे दिसते. 
 
(गेल्या वर्षीची आकडेवारी कंसात मिमी मध्ये १ जूनपासून ) 
धामणी ८३१ मिमी( ६३१ मिमी), कवडास ८३१ मिमी( ६५१ मिमी), भातसा ६८१मिमी( ६२४ मिमी), वांद्री ८३९ मिमी( ६८७ मिमी), मोडकसागर ५९६ मिमी( ५११ मिमी), तानसा ६०८.६० मिमी ( ४३० मिमी), बारवी ६६८ मिमी( ३९४ मिमी).