मुंबई : राज्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी, कोकणात संततधार सुरूच आहे. पुढील ४८ तासांत कोकणात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सोमवारी कायम होती. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांची अंशत: हानी झाली आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यात १०५३.३७ मि.मी.च्या सरासरीने ८४२७ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असले, तरी गेल्या आठ दिवसांत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याने भातशेतीच्या कामांना वेग आला आहे, तर नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. गतवर्षी १४ जुलैपर्यंत एकूण सरासरी १९५७ मि.मी. एवढा पाऊस पडला होता. यावर्षी अद्यापही गतवर्षीपेक्षा सरासरी ९०० मि.मी. एवढा पाऊस कमी झाला आहे. (प्रतिनिधी)
कोकणात मुसळधार पाऊस सुरूच
By admin | Updated: July 15, 2014 03:08 IST