शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पेंग्वीन दर्शन महागले प्रवेश शुल्कात वाढ

By admin | Updated: April 1, 2017 21:47 IST

पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक राणी बागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करीत आहेत. मात्र या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी आता मुंबईकरांना पैसे मोजावे लागणार आहेत.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 1 - पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक राणी बागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करीत आहेत. मात्र या परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी आता मुंबईकरांना पैसे मोजावे लागणार आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी रखडलेला हा प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला आहे. राणीच्या बागेत प्रवेश करतानाच मुलासाठी २५ तर प्रौढांना शंभर रुपये आकारण्यात येणार आहेत.

भायकळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात आणलेल्या पेंग्वीनचे दर्शन १७ मार्चपासून मुंबईकरांना होऊ लागले आहे. पहिल्याच आठवड्यात पेंग्वीन पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली. एकाच दिवसात ४० हजार पर्यटक आल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला. त्यामुळे राणीच्या बागेत प्रवेशासाठी शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत आज मांडण्यात आला. 

सध्या राणीच्या बागेत मुलांसाठी दोन रुपये तर प्रौढांसाठी पाच रुपये आकारण्यात येतात. यामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका निवडणुकीपूर्वी आणण्यात आला होता. मात्र याचे परिणाम निवडणुकीवर होतील, म्हणून शिवसेनेने यास विरोध करुन हा प्रस्ताव लांबणीवर टाकला होता. परंतु गटनेत्यांच्या बैठकीत आज दर निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक मुलासाठी २५ रुपये, प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर रुपये तर दोन मुलं व आई-वडील एकत्र आल्यास चौघांचे मिळून शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. प्रतिनिधीअसा होता मूळ प्रस्तावपेंग्विन दर्शनासाठी १२ वर्षांखालील मुलांना ५० रुपये तर प्रौढांना शंभर रुपये आकारण्याचे प्रस्तावित आहे. १ एप्रिलपासून नवीन दर लागू होणार होते. गटनेत्यांच्या बैठकीत यामध्ये आज बदल करीत मुलांसाठी २५, प्रौढांसाठी प्रत्येकी शंभर तर आई-वडील व दोन मुलं आल्यास शंभर असे दर आकारण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी सांगितले. दोन आठवड्यात दोन लाख पर्यटकबर्फाच्या गोळ्यासारखे पण तितकेच लोभस रुप असलेले हे पेंग्विन राणीच्या बागेतील एका छोट्याशा जागेत गेले आठ महिने राहत होते़. मार्चच्या दुस-या आठवड्यात राणी बागेतील प्रशस्त काचघरात त्यांना हलवण्यात आले. १८ मार्चपासून दोन लाख पर्यटक पेंग्वीन पाहण्यासाठी येऊन गेले आहेत. स. ९.३० ते संध्या. ५ पर्यंत व रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी ४ वाजेपर्यंत पेंग्वीन पाहता येईल. * एक ते दोन वर्षे वय असलेल्या या पेंग्विनचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे़* सद्यस्थितीत १२ ते १५ सेंमी उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सेंमी इतकी होईल.* त्यावेळीस त्यांचे वजन चार ते सहा किलो इतके असू शकेल़ त्यांचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असते* स्थायी समिती आणि महापालिकेच्या महासभेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच ही दरवाढ होणार आहे.