शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

मोतीबिंदूची चुकीची शस्त्रक्रिया करणे भोवले

By admin | Updated: November 5, 2015 03:00 IST

मोतीबिंदूची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करून, जंतूसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न करणे डॉक्टरांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य

वाशिम : मोतीबिंदूची शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने करून, जंतूसंसर्ग झाल्यावरही योग्य उपचार न करणे डॉक्टरांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मुंढे व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना बुधवारी निलंबित करण्यात आले.येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ आॅक्टोबर रोजी आयोजित एका शिबिरामध्ये २२ पेक्षा जास्त रुग्णांवर नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, ही शस्त्रक्रिया चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे आठ रुग्णांना डोळे गमवावे लागले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत, आरोग्य मंत्रालयाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना निलंबित केले. १५ आॅक्टोबर रोजी मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांना दुसऱ्याच दिवशी घरी पाठविण्यात आले. त्यानंतर डोळ्यात जळजळ होत असल्यामुळे रुग्ण रुग्णालयात परत आले. शस्त्रक्रियेत दोष असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रुग्णांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवले होते. यामध्ये काही रुग्णांना दृष्टी गमवावी लागण्याची शक्यता लक्षात आल्यावर, त्यांना मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)चुकीच्या पद्धतीने नेत्र शस्त्रक्रिया करणे व जंतूसंसर्ग झाल्यानंतरही योग्य उपचार न केल्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मुंढे व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.- रामचंद्र जाधव, उपसचिव, आरोग्य मंत्रालय, मुंबई