शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: May 21, 2016 01:33 IST

गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली

शेलपिंपळगाव : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रवासासाठी एसटी बसअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आगार व्यवस्थापनाने चाकण - शिक्रापूर महामार्गावरून शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. शालेय वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने खेडच्या पूर्व भागातील सुमारे १० ते १२ गावांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचा सर्वाधिक फटका महाविद्यालयीन मुलींना सहन करावा लागत आहे.बहुळ, शेलपिंपळगाव, सिद्धेगव्हाण, साबळेवाडी, चौफुला, मोहितेवाडी, नवीनगाव, चिंचोशी, दौंडकरवाडी, रामनगर, शेलगाव, कोयाळी-भानोबाची, गोलेगाव, वडगाव-घेनंद, भोसे, काळूस, संगमवाडी, दत्तवाडी, रासे आदी गावांतील बहुसंख्य विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी चाकण तसेच राजगुरूनगरमध्ये जात आहेत. बहुतांश विद्यार्थी पासधारक असल्याने शाळेत ये -जा करण्यासाठी एसटी बसचाच वापर त्यांना करावा लागत आहे. राजगुरूनगर, चाकणमधील महाविद्यालये साडेअकराच्या दरम्यान सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी चाकणहून दुपारी बाराच्या दरम्यान एसटी बस उपलब्ध नसल्याने, विद्यार्थ्यांची गैरसोय होते. परिणामी सर्वच विद्यार्थ्यांना बसपास किंवा एसटीपास असूनसुद्धा इतर वाहतुकीचा आसरा घेण्याची वेळ येत आहे. परिणामी वाहतुकीमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवासाचे जास्त पैसे आकारले जात असल्याने त्यांना नाहक ‘आर्थिक’ भुर्दंड सहन करून मार्गस्थ व्हावे लागते. चाकण-शिक्रापूर महामार्गावर चाकण आगारातून दुपारी सव्वाबाराच्या दरम्यान नव्याने एसटी बस सुरु करून द्यावी, अशी मागणी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थिनींकडून केली जात आहे.।‘‘एसटी बसअभावी प्रवासास आम्हा विद्यार्थिनींची गैरसोय होत असून, धोका पत्करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. कॉलेज सुटल्यानंतर पुन्हा घरी येण्यासाठी वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने प्रवासाचा प्रश्न समोर उभा राहतो. आमची गरज लक्षात घेऊन आगार व्यवस्थापनाने नवीन शैक्षणिक वर्षात वेळेत बससेवा सुरु करून द्यावी.’’- महाविद्यालयीन विद्यार्थिनी>नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याअगोदर सोय व्हावीशालेय व महाविद्यालयीन मुले रस्त्यावरील अवैध वाहतुकीचा आसरा घेऊन घरी मार्गस्थ होत असतात. परंतु मुलींना भीतीपोटी नाहक त्रास सहन करून एसटीचीच ताटकळत वाट पाहत उभे राहावे लागते. दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान चाकण चौकात हे चित्र नित्याचेच बनले आहे. दरम्यान रोडरोमिओंचा त्रासदेखील विद्यार्थिनींच्या पदरी येतो.चाकण-शिक्रापूर महामार्गावरून खासगी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असते. या वाहतुकीचे बहुतांशी चालक मद्यप्राशन करून वाहतूक करत असतात. शालेय विद्यार्थ्यांना सरकारी वाहन उपलब्ध नसल्याने या अवैध खासगी वाहतुकीचा आसरा घेऊन मार्ग काढावा लागतो. परंतु अशा मद्यपी चालकांमुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून हा प्रवास करावा लागत आहे.