शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादी भागात अपुरी पोलीस निवासस्थाने

By admin | Updated: December 10, 2015 02:51 IST

राज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत.

योगेश पांडे,  नागपूरराज्यातील नक्षलग्रस्त भागात जास्तीत जास्त सुरक्षाव्यवस्था वाढविण्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात येथे जाणारे पोलीस जवान मात्र हक्काच्या शासकीय निवासस्थानांपासून वंचित आहेत. खुद्द राज्य शासनानेदेखील ही बाब कबूल केली असून निवासस्थाने बांधण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. येथे कार्यरत असलेले पोलीस शासकीय निवासस्थानांपासून वंचित असल्याची बाब समोर आली होती. यासंदर्भात विधानपरिषद सदस्य ख्वाजा बेग, राजेंद्र जैन, संदीप बाजोरिया यांच्यासह ११ आमदारांनी बुधवारी प्रश्न उपस्थित केला होता. याला शासनातर्फे देण्यात आलेल्या लेखी उत्तरात गोंदिया जिल्ह्यात मंजूर संख्याबळाच्या तुलनेत निवासस्थाने अपुरी असल्याची कबुली देण्यात आली. गोंदिया आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ३५६ निवासस्थाने बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. तसेच गडचिरोली मुख्यालय व प्राणहिता उपमुख्यालय येथे ८७६ निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली. शिवाय चंद्रपूर आस्थापनेवर पोलीस मुख्यालयात १४९ निवासस्थाने तर भद्रावती येथे ६४ निवासस्थाने बांधण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेदेखील मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले.नक्षलवाद्यांविरोधात ‘सोशल’ जागृतीगडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीवर नियंत्रण आणता यावे यासाठी पोलिसांना अत्याधुनिक शस्त्रसामुग्री पुरविण्यासोबतच राज्य शासनाकडून सामाजिक पातळीवरदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत. स्थानिक गावकऱ्यांना नक्षल चळवळीतून वेगळे करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. याअंतर्गत जनजागरण मेळावा, ग्रामभेट योजना, महाराष्ट्र दर्शन योजना, स्वावलंबन योजना इत्यादी राबविण्यात येत आहेत. यातूनच नक्षलवाद्यांविरोधात गावकऱ्यांकडून गावबंदी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा प्रभाव दिसून येत असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे. माणिकराव ठाकरे, संजय दत्त, भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात शासनाने ही माहिती दिली आहे. याशिवाय नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी शस्त्र-दारूगोळा यांच्यासोबतच आधुनिक संपर्कव्यवस्था, वाहने, भूसुरूंग प्रतिबंधक वाहन, हेलिकॉप्टरदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. ‘एरिया डॉमिनेशन’च्या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षेकडेदेखील लक्ष देण्यात येत आहे. नक्षलवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध आणण्यासाठी नक्षलविरोधी शोध अभियान, गस्त, नाईट अ‍ॅम्बुळ, नाकाबंदी यांचे प्रमाणदेखील वाढविण्यात आले आहे, असेदेखील शासनाकडून स्पष्ट करण्यात आले.