शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

By admin | Updated: February 6, 2017 18:59 IST

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारिया

निवडणूक खर्चावर आयकर विभागाची करडी नजर : जे़ एस़ सहारियापंढरपूर : राज्यात होत असलेल्या निवडणुकीतील खर्च विषयक बाबींवर सुक्ष्म निरीक्षण ठेवण्यासाठी आयकर आणि विक्रीकर विभागाकडील अधिकाऱ्यांची नियक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे, वन विभाग, विमानतळ, सागरी मार्ग या ठिकाणी होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने तपासणी केंद्र तसेच वेगळी यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन जि़ प़ व पं़ स़ निवडणूक कामाचा आढावा घेतला़याप्रसंगी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चेन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी रणजीतकुमार, सहा़ पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उप विभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, तहसीलदार अनिल कारंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.निवडूक आयुक्त सहारिया म्हणाले, निवडणूक आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्वच निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपाय योजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. लोकांना अपेक्षित असलेली निवडणूक होण्यासाठी राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशानामार्फत काम केले जात आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी विहित मुदतीत आपल्या खर्चाचा तपशील आयोगाकडे सादर न केल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही आयक्त सहारिया यांनी सांगितले.निवडणूक आयोगाने एक आॅप विकसित केले जाते़ यावर मतदान केंद्राची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. तर उमेदवारास निवडणुकीसाठी केलेल्या खर्चाची माहितीही या अ‍ॅपद्वारे सादर करता येणार आहे. मतदारांना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची माहिती अवगत होण्यासाठी उमेदवारांच्या शपथ पत्राचा गोषवारा मतदान केंद्राबाहेर मतदारांना सहज दिसेल, अशा स्वरुपात बॅनरवर लावण्यात येणार आहेत. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचेही आयुक्त सहारिया यांनी सांगितले. राज्य घटनेने मतदानाचा दिलेला पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केले. (प्रतिनिधी)तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यरतजिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. हे तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यान्वित राहणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली.