शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

ई-लर्निंग प्रमाणपत्र नियमांत सुधारणा

By admin | Updated: August 1, 2015 02:16 IST

ई-लर्निंग शालेय साहित्याच्या प्रमाणपत्रासाठी बालभारतीने लागू केलेली ओपन सोर्स संगणक प्रणालीची अट शिक्षण मंत्रालयातून शिथिल करण्यात आली. मंत्रालयामध्ये यासंदर्भात झालेल्या

पुणे : ई-लर्निंग शालेय साहित्याच्या प्रमाणपत्रासाठी बालभारतीने लागू केलेली ओपन सोर्स संगणक प्रणालीची अट शिक्षण मंत्रालयातून शिथिल करण्यात आली. मंत्रालयामध्ये यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीला बालभारतीच्या वतीने संचालक चंद्रमणी बोरकर, आय. टी. विभागाचे प्रमुख योगेश लिमये व अ‍ॅकॅडमिक विभागाच्या सचिव धनवंती हर्डीकर उपस्थित होते. ई-लर्निंग साहित्य तयार करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीत असे प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, त्यांच्या काही अटी अवाजवी असल्याची तसेच परवानगी शुल्क जादा असल्याची तक्रारही केली.बालभारतीने सर्व कंपन्यांना त्यांचे ई-लर्निंग साहित्य ओपन सोर्स (लायसन्स कॉपी लागत नसलेली कोणतीही संगणक प्रणाली) प्रणालीत सादर करण्यास सांगितले आहे. प्रत्यक्षात बहुसंख्य कंपन्या त्यांचे ई-लर्निंग साहित्य विंडोज अथवा लायसन कॉपीच लागत असलेल्या प्रणालीमध्ये तयार करतात. त्यामुळे कंपन्यांचा बालभारतीच्या या अटीला विरोध आहे.लिमये यांनी बैठकीत सांगितले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शन सूचनांनुसार शैक्षणिक किंवा अन्य कोणतेही सरकारी साहित्य ओपन सोर्स प्रणालीमध्येच असणे बंधनकारक आहे. लायसन असलेल्या संगणक प्रणाली खूप महाग असतात व पालकांना त्याचा विनाकारण भुर्दंड पडतो.कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रधान सचिवांबरोबरच्या बैठकीत या अटीनुसार ई-लर्निंग साहित्य ओपन सोर्स प्रणालीत आणण्यास बराच कालावधी लागेल असे स्पष्ट केले. त्यावर सचिव नंदकुमार यांनी कंपन्यांची व्यावहारिक अडचण लक्षात घेता त्यांनी सध्या प्रमाणपत्रासाठी म्हणून विंडोजमधील साहित्य सादर केले तरी चालेल, मात्र परवानगी मिळाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत त्यांनी त्यांचे सर्व साहित्य ओपन सोर्स प्रणालीत आणावे, अशी सूचना त्यांनी केली. कंपन्यांनी ही अट मान्य केली.