शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

सुधार समिती : बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाला मंजुरी

By admin | Updated: January 12, 2017 04:43 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्याचे शिवसेनेचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखवल्यानंतर, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आज तातडीने सुधार समितीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, दादर पश्चिम शिवाजी पार्क येथील पुरातन वास्तू असलेल्या महापौर बंगल्यात हे स्मारक तयार होणार आहे. एकीकडे युतीसाठी चर्चा सुरू झालेली असताना, मित्र पक्ष भाजपाकडून शिवसेनेला मिळालेली ही भेट वेगळे संकेत देत आहे.शिवसेना प्रमुखांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी गेली पाच वर्षे जागेचा शोध सुरू आहे. अखेर शिवसेनेचा पूर्वीचा बालेकिल्ला असलेल्या महापौर बंगल्याची निवड करण्यात आली. युतीमध्ये फूट पडली, तरी भाजपाने साथ दिल्याने स्मारकासाठी जागेचा प्रश्न सुटला आहे. महापौर बंगला ३० वर्षांच्या भाडेकरारावर या स्मारकासाठी स्थापन झालेल्या संस्थेला मिळणार आहे. यासाठी दरवर्षी नाममात्र एक रुपया शुल्क आकारण्यात येणार आहे. ही मंजुरी राज्य सरकारकडून मिळाली, तरी कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे महापालिकेच्या सुधार समितीची मंजुरी आवश्यक होती. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल आज वाजणार हे निश्चित असल्याने, महापालिका मुख्यालयात सकाळी तातडीने बैठक बोलावून ही जागा स्मारकासाठी स्थापन न्यासाला हस्तांतरित करण्याची मंजुरी शिवसेना-भाजपाने घाईघाईने दिली. (प्रतिनिधी)तातडीने बैठकनिवडणुकीचे बिगुल आज वाजणार हे निश्चित असल्याने, सकाळी तातडीने बैठक बोलावून ही जागा स्मारकासाठी स्थापन न्यासाला हस्तांतरित करण्याची मंजुरी देण्यात आली.