शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पदच्युत पंतप्रधानांवर चालणार महाभियोग

By admin | Updated: May 8, 2014 23:27 IST

थायलंडमधील राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने पदच्युत पंतप्रधान इंगलुक शिनवात्रा यांच्यावर वादग्रस्त तांदूळ अनुदान योजनेवरून गुरुवारी आरोप ठेवले.

बँकाक : थायलंडमधील राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने पदच्युत पंतप्रधान इंगलुक शिनवात्रा यांच्यावर वादग्रस्त तांदूळ अनुदान योजनेवरून गुरुवारी आरोप ठेवले. आता या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध संसदेच्या वरिष्ठ सभागृहात महाभियोग चालणार असून तो मंजूर झाल्यास त्यांना पाच वर्षे राजकारणापासून दूर राहावे लागेल. इंगलुक यांच्यावर आरोप ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोगाने एकमताने घेतला, असे आयोगाचे प्रमुख पान्थेप क्लानारोंग यांनी गुरुवारी सांगितले. समितीने त्यांच्याविरुद्धच्या प्रकरणाची चौकशी केली असून खटला सुरू करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे आढळून आले आहे. आम्ही हे प्रकरण आता संसदेकडे पाठवत आहोत, असेही क्लानारोंग म्हणाले. तांदूळ अनुदान योजनेखाली सरकारने देशातील शेतकर्‍यांकडून जागतिक बाजारपेठेतील किमतीहून कितीतरी अधिक दराने तांदूळ खरेदी केला. मात्र, यामुळे तांदळाचा साठा प्रचंड वाढून त्याचा देशाच्या तांदूळ निर्यातीला प्रचंड फटका बसला. ही योजना अत्यंत खर्चिक होती आणि त्यात भ्रष्टाचारालाही प्रचंड वाव होता, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. सत्तेचा दुरुपयोग केल्यावरून घटनापीठाने शिनवात्रा यांच्यासह त्यांच्या नऊ मंत्र्यांना बुधवारी पदावरून हटविले होते. (वृत्तसंस्था) २०११ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा प्रमुखांची गैरमार्गाने करण्यात आलेल्या बदलीत शिनवात्रा यांचा हात असल्याचे सांगत घटनापीठाने काल त्यांना बडतर्फ केले होते. मात्र, शिनवात्रा यांच्या समर्थकांना न्यायालय त्यांच्याबाबत भेदभाव करीत असल्याचे वाटते. नोव्हेंबर २०१३ मध्ये सरकारविरोधी निदर्शकांनी आंदोलन पुकारल्यापासून थायलंडमध्ये राजकीय संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान शिनवात्रा यांनी हे संकट सोडविण्यासाठी मध्यावधी निवडणूक घेतली. त्यात त्यांचा विजय झाला; मात्र न्यायालयाने ही निवडणूक घटनाबाह्य ठरविली. ४शिनवात्रा यांना पदच्युत करणार्‍या घटनापीठाच्या न्यायाधीशांमध्ये समावेश असलेल्या सुफोत कॅमुक यांच्यावर घरावर गुरुवारी एक हातबॉम्ब फेकण्यात आला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. न्यायाधीश कॅमुक यांच्यावर उत्तररात्री २ वाजता एम-६७ नामक हातबॉम्ब फेकण्यात आला. या स्फोटात एक वाहन व छताचे काही प्रमाणात नुकसान झाले. कॅमुक यांच्यासह नऊ न्यायाधीशांनी शिनावात्रा यांना सत्तेच्या दुरुपयोगाबद्दल पदच्युत केले होते. हल्ला झाला तेव्हा कॅम्युक घरी नव्हते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.