शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांना मिळणार तत्काळ मदत

By admin | Updated: August 21, 2015 01:17 IST

महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, त्यावर जीआरपीकडून (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलीस) अखेर उपाययोजना करण्यात येणार आहेत

सुशांत मोरे,मुंबईमहिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, त्यावर जीआरपीकडून (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलीस) अखेर उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला आरक्षित डब्यांना पोलिसांची उपस्थिती दर्शविणारे स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची तत्काळ अंमलबजावणीही केली जाणार आहे. यामुळे डब्यात पोलीस कोणत्या वेळेत असतात ही माहिती महिला प्रवाशांना समजण्यास मदत मिळेल. महिला डब्यात पोलीस नसल्यास त्याची माहिती संबंधित नियंत्रण कक्षाला देण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप नंबर आणि हेल्पलाइन नंबरही ठळकपणे देण्यात येणार आहे.चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या एका युवतीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना समोर आली. यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. २0१0मध्ये विनयभंगाच्या १५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २0१४मध्ये याच तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली असून, ५५ तक्रारी दाखल झाल्याचे सांगण्यात आले. हे पाहता महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत जीआरपीकडून अभ्यास केला जात होता. त्याचा अहवाल नुकताच पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांना सादर करण्यात आला. यात आरक्षित महिला डब्यांना रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीची माहिती दर्शविणारे स्टिकर्स लावण्याचे सुचविण्यात आले आहे. यात आरक्षित महिला डब्यात पोलीस तैनात असतो की नाही इ. माहिती या स्टिकरवर असणार आहे, असे पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महिला डब्यातही जीआरपीचा व्हॉट्स अ‍ॅप हेल्पलाइन नंबर आणि नियंत्रण कक्षाचा नंबर दर्शविणारे स्टिकर्स लावण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.