शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमा जपताहेत मोदी

By admin | Updated: May 10, 2015 00:20 IST

काळ, काम आणि वेग या बीजगणितीय समीकरणात ‘रिटर्न आॅन इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणुकीवरील परतावा... हा घटक समाविष्ट केला की, अवतरणारा

मनोज गडनीस - काळ, काम आणि वेग या बीजगणितीय समीकरणात ‘रिटर्न आॅन इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणुकीवरील परतावा... हा घटक समाविष्ट केला की, अवतरणारा दृश्य अवतार म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र. किती कमी वेळात किती अधिक परतावा यावर नफ्या-तोट्याचा आणि यशाचा तराजू तोलला जातो. पण जसजसा काळ पुढे सरकत चालला आहे आणि ज्या पद्धतीने अपेक्षापूर्तीचे चित्र रंगवले गेले होते त्याचा वेग मंदावल्याचे दिसल्यानंतर आता तेच कॉर्पोरट क्षेत्र हळूहळू वास्तव सांगायचे धाडस करू लागले आहे. वास्तव आणि धाडस या शब्दाचा वापर तसा जाणीवपूर्वकच. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होताना देशातील कॉर्पोरेट क्षेत्राचे सरकारबद्दलचे मत हे केलेल्या घोषणा, दिलेली वचने यांचे वस्तुस्थितीच्या पातळीवर विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत आहे. कॉर्पोरेट उद्योगाची मोदी यांच्याशी गुजरातच्या मुख्यमंत्री असताना असलेली जवळीक आणि आता पंतप्रधान झाल्यावर त्यात पडलेले अंतर, यामुळे काहीशी घुसमट होत असल्याचे दिसून येते. सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने काही प्रमुख उद्योगप्रमुखांची जाणून घेतलेली मते (आणि नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी दिलेली माहिती) संमिश्र जरी असली तरी पुरेशी बोलकी आहे. दिल्लीच्या हवेत सरकारबद्दल जशा राजकीय चर्चा रंगतात आणि किस्से कानावर येतात, तसेच मुंबईच्या कॉर्पोरेट विश्वातही अशा चर्चा आणि किस्से कानावर पडत आहेत, त्याचा हा काहीसा कानोसा.