शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिमाच्या भावोजीला जामीन नाकारला

By admin | Updated: February 14, 2015 03:47 IST

मडगाव : वास्को येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर याने जरी या खून प्रकरणात आपला कुठलाही हात नाही,

मडगाव : वास्को येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर याने जरी या खून प्रकरणात आपला कुठलाही हात नाही, असा दावा केला तरी उपलब्ध पुराव्यानुसार या संशयिताचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे दिसून आले आहे, असा स्पष्ट निष्कर्ष दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी काढत संशयिताचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. आतापर्यंत जे पुरावे उपलब्ध झाले आहेत, ते पाहिल्यास या प्रकरणाशी संशयित कोरगावकर याचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा संशयिताचे वकील राजीव गोमीस यांनी केला असला तरी त्यात तथ्य वाटत नाही. या खून प्रकरणात प्रतिमा हिचा हात असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत संशयित कोरगावकर याला जामीन दिल्यास एकूणच तपासावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत न्या. सरदेसाई यांनी हा अर्ज फेटाळला. नाईक सासू-सुनेच्या हत्या प्रकरणाची आपल्याला कुठलीही माहिती नाही, असा दावा या प्रकरणाची संशयित असलेली प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर हा करीत असला तरी त्याच्याकडून पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्यात, गळा आवळण्यासाठी वापरलेल्या नायलॉनच्या दोरीबरोबरच झोपेच्या गोळ्यांची पावडर सापडल्याची माहिती सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी बुधवारी न्यायालयाला दिली होती. वास्को पोलिसांच्या तपासाप्रमाणे ज्या रात्री प्रतिमाने हे दोन खून केले, त्या रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास प्रतिमाने अभिजितला बोलावून घेतले. त्यापूर्वी घरातील सर्व दागिने, रोख रक्कम, ज्या नायलॉन दोरीने तिने आपल्या सासूचा गळा आवळला होता ती दोरी, त्या दोघांनाही बेशुध्द करण्यासाठी जेवणात मिसळण्यासाठी तयार केलेली झोपेच्या गोळ्यांची पावडर, या कारस्थानासाठी नव्याने विकत घेतलेला मोबाईल फोन हे सर्व प्रतिमाने एका पॅम्परच्या पिशवीत घालून ती पिशवी घराबाहेर थांबलेल्या अभिजितकडे दिली होती. अभिजितने ही पिशवी आपल्या ड्युओ स्कुटरमध्ये ठेवली होती. सुरुवातीला पोलिसांनी प्रतिमाच्या घरी फक्त स्वत:ला जखमी करण्यासाठी वापरलेला सुरा सापडला होता. मात्र, नंतर पोलिसांच्या दबावापुढे प्रतिमा धडाधड बोलू लागली, त्या वेळी तिने हे सर्व सामान अभिजितकडे असल्याचे सांगितले आणि पोलिसांनी त्या ड्युओ स्कुटरसह सर्व सामान अभिजितकडून ताब्यात घेतले होते. (प्रतिनिधी)