शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘आयआयएम-नागपूर’कडे अभियंत्यांचाच ओढा

By admin | Updated: May 7, 2017 04:33 IST

महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर

योगेश पांडे/ लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर पडली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापनातील दर्जेदार शैक्षणिक संस्था ठरलेल्या ‘आयआयएम’कडे सर्वांत जास्त ओढा अभियंत्यांचाच राहिला आहे. यातही ‘आयटी’ क्षेत्रातील अनुभवी अभियंत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त दिसून आले आहे. येत्या काळात हा ‘ट्रेण्ड’ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे देण्यात आले आहे व तेथील अनेक प्राध्यापक नागपुरातदेखील धडे देतात. साधारणत: व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाणिज्य, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी जास्त प्रमाणात प्रवेश घेतात, असा समज आहे.मात्र ‘नागपूर-आयआयएम’ याला अपवाद ठरले आहे. ‘आयआयएम’च्या दोन्ही ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचे ‘प्रोफाईल’ पाहिले असता येथील ९४ टक्के विद्यार्थी हे अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असल्याचे स्पष्ट झाले.२०१५ सालच्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यातील ५१ विद्यार्थी हे अभियांत्रिकी पदवीधर होते. तर २०१६-१८ या ‘बॅच’मध्ये प्रवेशित ५६पैकी ५३ (९४.६४%) विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. वाणिज्य क्षेत्रातील केवळ २ (३.५७ %) विद्यार्थी असून, एकाने (१.७८ %) ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ‘आयटी’तील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. सध्याच्या ‘बॅच’मध्ये ३२ विद्यार्थी (५७.१४ टक्के) ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. तर उर्वरित २१ विद्यार्थी विविध अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहेत.अनुभवाची टक्केवारीअनुभव२०१५-१६२०१६-१८फ्रेशर्स३१ %७.१४ %० ते २ वर्षे३३ %१७.८६ %२ ते ३ वर्षे१६ %४२.८६ %३ वर्षांहून अधिक२० %३२.१४ %