शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

औषधी खरेदीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: July 14, 2014 09:42 IST

मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही.

 

रुग्णांना चार ते पाच हजार रुपये खर्च

मनपा दवाखान्यांची स्थिती : दोन वर्षांपासून निविदाच नाही

जळगाव : मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही. त्यामुळे दरमहा लाख रुपयांची औषधी विनानिविदा खरेदी केली जात असून रुग्णाच्या नातेवाइकांना बहुतांश औषधी बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे.मनपाकडून आर्थिक परिस्थिती ठीक नसतानाही सामान्य जनतेला रुग्णालयांच्या माध्यमातून अल्पदरात सेवा दिली जात असल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात गोरगरीब जनतेला मात्र ही सेवा अल्पदरात मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. कारण मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयासह तीन रुग्णालयांमध्ये सुतिकागृहाची सोय असून तेथे अल्पदरात तपासणी करून प्रसूतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मनपा दवाखाने विभागाचे औषध खरेदीसाठीची निविदाच गेल्या दोन वर्षांपासून निघालेली नाही. त्यामुळे दरमहा एक लाखापर्यंतची औषधी ५00 रुपयांच्या बिलांच्या आधारे खरेदी केली जात आहे. टक्केवारीचा खेळनिविदा न मागविता रोखीने औषध खरेदी केल्यास संबंधिताना ३0 टक्के हिस्सा मिळत असल्यानेच निविदा प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते. औषधे बाहेरून आणायला सांगितल्यावर रुग्णाचे नातेवाईक व कर्मचारी, डॉक्टरांमध्ये वादही होत असल्याचे समजते. शासनाने मोफत औषध पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच जेनेरिक औषधे खरेदी केली तरीही मनपाची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक बचत होणार आहे. मात्र यासाठी औषधांची यादी तयार करण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबितच असल्याचे समजते. रुग्णांना चार ते पाच हजार रुपये खर्च मनपाची औषधांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आरसीएचसाठी शासनाकडून वर्षभरापूर्वी औषधी मिळाली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी आणखी प्रस्ताव पाठविला. मात्र शासनाकडून औषधी मिळालेली नाही. एनयुएचएमअंतर्गत औषधांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. त्याचे काम सुरू आहे.-डॉ. राम रावलानी,मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

दरमहा लाखाची औषधी खरेदी केली जात असली तरीही प्रसूतीसाठी दाखल रुग्णाच्या नातेवाइकांना औषधांची यादी हाती सोपवून बाहेरून औषधे विकत आणायला सांगितली जात आहेत. जी औषधी मोफत मिळायला हवी, त्यापोटी चार-पाच हजार रुपये खर्च रुग्णाच्या नातेवाइकांना करावा लागत आहे. मनपा प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.