शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

पुणो मेट्रोकडे केंद्राचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 12, 2014 23:59 IST

केंद्र सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात गुजरातमधील अहमदाबाद व उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरातील मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे.

येरवडा  : केंद्र सरकारने सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात गुजरातमधील अहमदाबाद व उत्तर प्रदेशमधील लखनौ शहरातील मेट्रोसाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, पुण्यातील मेट्रोसाठी अजिबात तरतूद केलेली नाही. रेल्वे अर्थसंकल्पातही पुणोकरांच्या तोंडाला पानेच पुसण्यात आली आहेत. राज्यातील विकासकामे व समस्यांबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात भाजपाचे खासदार कमी पडत असल्याचे मत शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 
विमाननगरमध्ये महापालिकेच्या वतीने साकारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकचे (रिंक) उद्घाटन पुणो शहरासाठी होत असलेल्या भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे तसेच महावितरणकडून करण्यात येणा:या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील वीजवाहिन्यांच्या कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, उपमहापौर बंडू गायकवाड, पालिका आयुक्त विकास देशमुख, आमदार बापूसाहेब पठारे, शरद रणपिसे, सभागृह नेते सुभाष जगताप,  बापूराव कण्रे,  अशोक खांदवे, उषा कळमकर, संजिला पठारे, सुमन पठारे, मीनल सरवदे, मीना परदेशी, महेंद्र पठारे, महादेव पठारे, अनिल टिंगरे, सतीश म्हस्के, तसेच अॅड. नानासाहेब नलावडे, अर¨वंद गोरे व कैलास पठारे उपस्थित होते.  
 
..सामान्यांनी 
पाहायचे कोणाकडे? 
1 पुणो शहरात 2 दिवसांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटासाठी साता:यामधील पोलिसाची चोरून आणलेली दुचाकी वापरण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्याच मोटारी चोरीला जात असतील, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित केला. 
2शहरात सीसीटीव्ही बसविण्याचे कंत्रट घेतलेल्या ठेकेदाराच्या चुकीमुळे व अपयशामुळे अद्यापही यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही, अशा ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना आपण केल्या आहेत. 
 
हवामान खातं 
की कसलं खातं ! 
1 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीडियाचा चांगलाच धसका घेतल्याचे, त्यांच्या पुण्यातील कार्यक्रमातील भाषणात जाणवत होते.   हवामान खाते 2 दिवसांत राज्यात भरपूर पाऊस पडेल, असे वारंवार सांगत आहे. मात्र, अद्याप हवा तेवढा पाऊस झालेला नसल्याचे म्हणून, ‘‘हे हे हवामान खातं की कसलं खातं, तपासलं पाहिजे.’’ 
2विमाननगरमधील आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकचे कौतुक करताना- या ट्रॅकची संकल्पना मांडलेल्या; पण पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या एका पदाधिका:याकडे पाहत, ‘शहरात एवढय़ा चांगल्या संकल्पना राबवूनही तू पराभूत झाला कसा,’ असा सवाल पवार यांनी केला.