शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2016 04:38 IST

अतिदुर्गम भागात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

मंगेश भांडेकर,

चंद्रपूर- अतिदुर्गम भागात एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्याने अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यावर तोडगा करण्यासाठी राज्य शासनाने बीएएमएस डॉक्टरांची या पदांवर नियुक्ती केली. मात्र त्यांची नियुक्ती अस्थायी स्वरूपाची असल्याने त्यांना शासनाच्या सर्व सोईसुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यासही त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही आर्थिक मदत देण्यात येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांमध्ये रोष पसरला आहे.एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने आयुक्त व आरोग्य सेवा उपसंचालक यांची अध्यक्ष व सचिव म्हणून नियुक्ती करून २००५ मध्ये राज्यभरात ७९१ बीएएमएस डॉक्टरांची अस्थायी स्वरूपात नियुक्ती केली आहे. त्यामुळे वार्षिक वेतनवाढ, गटविमा, अंशदायी निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजना या डॉक्टरांना लागू नाहीत. त्यातच कर्तव्यावर मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत मिळत नाही. या डॉक्टरांच्या समस्या महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघाने वेळोवेळी शासनदरबारी मांडल्या. मात्र त्याकडे शासनाचे दुर्लक्षच होत आहे. >डॉक्टरांनी गमावला जीवकर्तव्यावर असताना रुग्णवाहिकेचा अपघात होऊन डॉ. अरुण जंगले व डॉ. रोशन अहिरे यांचा मृत्यू झाला. तसेच डॉ. राम हुमने यांचे हृदयविकाराने, डॉ. अरुण थोरात यांचे पाण्यात बुडून, डॉ. दिनेश पाटील यांचा अपघातात, डॉ. शैलेंद्र गणवीर यांचा हृदयविकाराने, डॉ. प्रमोद वाळुंजकर यांचा किडनीच्या आजाराने, डॉ. कृष्णा मरस्कोल्हे यांचा कर्करोगाने आणि डॉ. रविराम जरकर यांचे हृदयविकाराने निधन झाले. मात्र या डॉक्टरांच्या कुटुंबांना शासनाकडून एक रुपयाचीही मदत मिळाली नाही.>दारुकांडातील मृतांना शासनाने आर्थिक मदत दिली. बस अपघातातील मृतांना शासनाकडून मदत मिळते. मात्र कर्तव्यावर एखाद्या बीएएमएस डॉक्टरचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जात नाही, हा अन्याय आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून बीएएमएस डॉक्टरांना स्थायी करावे व शासनाच्या सर्व सुविधांचा लाभ मिळवून द्यावा.- डॉ. स्वप्निल टेंभे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय अधिकारी महासंघ, चंद्रपूर