शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही लंगोट लावून या, आम्हीच चितपट करणार

By admin | Updated: September 10, 2016 01:18 IST

अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परंतु, बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली आहे.

बारामती : अनेक राजकीय घडामोडी घडल्या. परंतु, बारामतीकरांनी आम्हाला साथ दिली आहे. त्यामुळेच बारामतीचा चौफेर विकास करणे आम्हाला शक्य झाले. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकात ‘तुम्ही लंगोट लावून या अथवा बिनालंगोटचे या तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा विरोधकांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बारामती नगरपालिकेच्या एका कार्यक्रमात विकासकामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नगरपालिकेच्या प्रत्येक कामाकडे आपले लक्ष आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या नागरी वस्त्यांमध्ये विकास होण्यासाठी काळजी घेतली जात आहे, असे सांगितले. आपली सत्ता नसली की काही मंडळी ‘माझे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहेत. माझी या मंत्र्यांशी ओळख आहे. त्या मंत्र्यांशी ओळख आहे,’ अशा भूलथापा देतात. त्यांच्याकडे लक्ष न देता बारामतीकरांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन पवार यांनी केले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील नगरसेवकांनीच सध्या बंड पुकारले आहे. त्याचबरोबर भाजपाच्या नेत्यांनीदेखील कंबर कसली आहे. त्यांच्यावर टीका करताना पवार यांनी ‘तुम्ही लंगोट लावून या अथवा बिनलंगोटचे या. तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा पवार यांनी दिला. याशिवाय बारामतीत पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचे कडक शब्दांत समाचार घेतला. बारामतीची धनकवडी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा नगररचना खात्याने केल्याचा दावा पवार यांनी केला. (प्रतिनिधी)>रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाला विरोध नकोबारामती दक्षिण भारताला रेल्वेच्या माध्यमातून जोडण्यासाठी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. त्याच्या भूसंपादनासाठी विरोध न करता भविष्यातील विकास डोळ्यासमोर ठेवावा, असेही शेतकऱ्यांना सांगितले. आता विरोध झाला तर पुढच्या पिढीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. दळणवळणाची साधने वाढल्यावर बारामतीच्या व्यापारपेठेला अधिक महत्त्व येईल.