शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बिनबुडाचे आरोप कराल तर कोर्टात खेचू !

By admin | Updated: October 6, 2014 00:05 IST

बुलडाणा येथील जाहीर सभेत सुप्रिया सुळे यांचा नरेंद्र मोदींना इशारा.

बुलडाणा : सध्या काही पक्षाचे दिल्लीहून आयात केलेले नेते महाराष्ट्रात येवून पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर वाट्टेल ते आरोप करीत आहेत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्राचे रहिवासी आहोत; पण पवार कुटुंबीयांवर बिनबुडाचे आरोप कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. तुम्ही असाल पंतप्रधान, पण खोटे आरोप कराल, तर तुम्हाला कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी रविवारी बुलडाणा येथील जाहीर सभेत दिला. यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला व फुले, शाहु, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर चालत असलेला महाराष्ट्र, देशात एक नंबरचे राज्य असताना, महाराष्ट्राने मान खाली घालावी अशी राज्याची बदनामी सुरू आहे. महाराष्ट्र सर्वात मागे आहे, असे म्हणणार्‍यांनी जे स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. त्याची मुहूर्तमेढ याच महाराष्ट्रातील संत गाडगेबाबा यांनी केली होती. त्याला पंधरा वर्षापूर्वी आर. आर. पाटील यांनी मूर्त स्वरूप दिले होते. देशाला रोजगार हमी योजना याच महाराष्ट्राने दिली. इको व्हिलेज योजना जयंत पाटील यांनी सुरू केली. माहिती नसेल तर माहीत करून घ्या, मात्र खोटे आरोप करू नका, असा सल्ला खा. सुळे यांनी दिला. निवडणूका आहेत, आमच्या महाराष्ट्रात तुमचा सन्मान आहे. तुम्ही या, भाषण करा, आमचे चुकत असेल तर निश्‍चित आमच्यावर टीका करा. आम्हाला तेही मान्य आहे. मात्र यापूर्वीही शरद पवार यांच्यावर अनेकवेळा खोटे आरोप झाले. ट्रकभर पुरावे देतो, अशी गर्जना करणार्‍यांना त्यांच्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. आता पुन्हा महाराष्ट्राला उल्लु बनवत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दात सुळे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.