शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

उडाले तर कावळे.. ..बुडाला तर बेडूक!

By admin | Updated: September 18, 2014 01:59 IST

राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात दंग.. अशावेळी गुरुजी अन् कार्यकत्र्याच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन.)

(स्थळ : गावाबाहेरच्या शाळेत गुरुजी म्हणींचा वर्ग घेण्यात मग्न. खिडकीलगतच्या पारावर चार कार्यकर्ते पेपरातल्या राजकीय बातम्या जोरजोरात वाचण्यात दंग.. अशावेळी गुरुजी अन् कार्यकत्र्याच्या वेगवेगळ्या संवादाचं जुळलेलं हे भन्नाट कॉम्बिनेशन.)
आतून गुरुजी : मुलांनोùù, आज तुम्हाला काही म्हणी शिकवतो. घ्या लिहून.
बाहेर कार्यकर्ता : (मथळे वाचत) देशभरातल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट भुईसपाट.
गुरुजी : बैल गेला अन् झोपा केला.
कार्यकर्ता : निकालानंतरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया, ‘कहाँ गये वो अच्छे दिन?’
गुरुजी : नागोबा-म्हसोबा पैशाला दोन.. पंचमी झाल्यावर पुजतंय कोण ?
कार्यकर्ता : ‘मोदी लाटे’वर विश्वास ठेवून मोठमोठी स्वप्न पाहणारी राज्यातली नेतेमंडळी जमिनीवर.
गुरुजी : ऐन दिवाळीत दाढदुखी !
कार्यकर्ता : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटेना.
गुरुजी : तुझं माझं जमेना.. तुङया वाचून करमेना.
कार्यकर्ता : पश्चिम महाराष्ट्रात म्हणो ‘आघाडी’त मैत्रीपूर्ण लढती होऊ देणार.
गुरुजी : रोग म्हशीला.. अन् इंजेक्शन पखालीला.
कार्यकर्ता : अजितदादांची परत घोषणा, ‘कोणत्याही परिस्थितीत एकशे चव्वेचाळीस जागा घेणारच.’
गुरुजी : उथळ पाण्याला खळखळाट फार.
कार्यकर्ता : शरद पवारांची मात्र सावध भूमिका, ‘दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलूनच जागावाटपाचा अंतिम निर्णय घेऊ!’
गुरुजी : झाकली मूठ सव्वा लाखाची !
कार्यकर्ता : पितृपक्ष संपल्याशिवाय उमेदवार जाहीर होणार नसल्यानं इच्छुकांची घालमेल वाढली.
गुरुजी : करायला गेले नवस अन् आज निघाली अवस ! 
कार्यकर्ता : नेहमी खमंग टीका करणा:या राज ठाकरेंना नाशकात काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा.
गुरुजी : दुभत्या गायीच्या लाथा गोड !
कार्यकर्ता : ‘भावी मुख्यमंत्री कोण?’ यावरून भाजपा-शिवसेनेत शाब्दिक संघर्ष.
गुरुजी : बाजारात तुरी अन् 77  777 ला मारी!
कार्यकर्ता : ‘मनसे’चे संपूर्ण राज्यात उमेदवार.
गुरुजी : उडाले तर कावळे.. बुडाला तर बेडूक!
कार्यकर्ता : ‘महायुती’तल्या इतर घटक पक्षांनाही म्हणो भरपूर मंत्रिपदे पाहिजेत. आतापासूनच सत्तेची घाई.
(एवढय़ात गुरुजींना ठसका लागतो. मग मुलंच पुढची अस्सल गावरान म्हण सांगतात.) 
वर्गातली मुलं : (एकसुरात) पायलीची सामसूम अन् चिपटय़ाची धामधूम !
                                    - सचिन जवळकोटे