शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती दिल्यास आम्ही सत्ता सोडू

By admin | Updated: May 20, 2017 05:35 IST

राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील यासाठी सर्व्हे केला जात आहे. मध्यावधीची चाचपणी कशाला करता? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या, आम्ही सरकारला बाहेरून भक्कम पाठिंबा देऊ, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील शेतकरी मेळाव्यात केली.शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेनेने हाती घेतलेल्या अभियानाचा शुभारंभ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज झाला. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र व राज्य सरकारे, तसेच भाजपावर सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘‘केंद्रात व राज्यात सत्ता मिळूनही भाजपा सत्तापिपासू झाली आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका झाल्यास किती जागा मिळतील, यासाठी सर्व्हे केला जात आहे.’’ तूरखरेदीतील घोटाळ्यामुळे शेतकरी संकटात सापडला असताना सरकार शेतकऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार बदलले, तरी चेहरा तोच असल्याची खंत व्यक्त करून उद्धव यांनी, मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ‘अभ्यासू विद्यार्थी’ झाल्याचा टोला लगावला. समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढूशेतकऱ्यांना ‘रडतात साले’ असे म्हणणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. दानवेंचे ते विधान ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली. सत्तेची मस्ती चढल्यामुळेच अशा प्रकारची भाषा केली जात असेल तर साले म्हणणाऱ्यांचे सालपट काढू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.कर्जमुक्ती नसेल, तर खात्यावर १५ लाख द्या!उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नोटाबंदी व मन की बात या विषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टीकेचे लक्ष्य केले. परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याच्या घोषणेचे काय झाले? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देता येत नसेल, तर त्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ लाख रुपये टाका, असे ठाकरे म्हणाले.शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप : शेट्टी : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने ३ वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी केला. २२ मेपासून पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.