शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गवर अन्याय झाल्यास मंत्र्यांची गाडी अडवू : राणे

By admin | Updated: December 11, 2014 23:42 IST

जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही.

सावंतवाडी : गेल्या पाच वर्षात विधानसभेत तोंड न उघडणाऱ्या आमदारांनी आता राज्यमंत्री झाल्यावर जिल्ह्याचा विकास आराखडा ७५ हजार कोटींवरून एक लाख कोटीपर्यंत घेऊन जावे, आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून आमच्यावर अन्याय करणार असाल, तर यापुढे एकाही मंत्र्याची गाडी जिल्ह्यात फिरू देणार नाही. गाडीच्या आडवा उभा राहणारा मी पहिला असेन, असा इशारा काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला.ते सावंतवाडी तालुका काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, सभापती प्रमोद सावंत, गुरूनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, तालुकाध्यक्ष संजू परब, बाळा गावडे, मंदार नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी बोलताना राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर आतापर्यंत कोणत्याही आमदाराने आवाज उठवला नाही. आमदार नीतेश राणे यांनी तीन दिवसात विधानसभा दणाणून सोडली. येथील आमदार मागच्या सरकारात होते. त्यावेळी त्यांनी आपली निष्ठा शरद पवारांवर वाहिली होती. पवारच आपले बाप म्हणत पण आता पवारांना सोडून मातोश्रीच्या दरवाजावर जाऊन मंत्रीपद मिळवले. मंत्रिपदाला कोणीही विचारत नाही आणि कोणी त्यांचे सल्लेही घेत नाही. फक्त नावाला राज्यमंत्री असतात, असे सांगत राणे यांनी जिल्ह्याचा आराखडा युती सरकार येताच कमी झाला असून तो आराखडा १ लाख कोटींवर नेऊन ठेवा, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, काँगे्रस संघटनेत बदल करण्याची वेळ येऊन ठेपली असून आता आपणास विरोधी पक्षात असल्याचे भान ठेऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकीने काम करा आणि पुन्हा एकदा आपल्या बद्दलचा विश्वास निर्माण करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या मेळाव्यात डॉ. जयेंद्र परूळेकर, संदीप कुडतरकर, अंकुश जाधव, बाळा गावडे, सभापती प्रमोद सावंत आदींनी विचार मांडले. या मेळाव्याचे प्रास्ताविक अन्वर खान यांनी तर नारायण राणे यांचे स्वागत संजू परब यांनी केले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी)‘त्यासाठी’ प्रधान सचिवांना फोन केलामी कोणत्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. मात्र, सावंतवाडीत विद्युत तारा पडून दोन युवकांचा मृत्यू झाला. या घटनेची दखल घेत प्रधान सचिवांना फोन केला आणि युवकांच्या पत्नीला नोकरी देण्याची सूचना केली. त्याला सचिवांनी संमती दर्शवली असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.