शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडर असल्यास यापुढे केरोसिन नाही

By admin | Updated: August 21, 2015 00:41 IST

घरगुती वापराचे गॅस सिलिंडर असलेल्यांना यापुढे शिधापत्रिकेवर केरोसिन न देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे

मुंबई : घरगुती वापराचे गॅस सिलिंडर असलेल्यांना यापुढे शिधापत्रिकेवर केरोसिन न देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील शिधापत्रिकाधारकांना केरोसिनचे समान वाटप करण्याचा निर्णयही विभागाने घेतला आहे.एका गॅस सिलिंडरची जोडणी मिळालेल्यांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळत असल्याने यापुढे त्यांना केरोसिन मिळणार नाही, असे विभागाने आज काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळा कोटा होता. शहरांसाठीच्या कोट्याची विभागणी आठ प्रकारात करण्यात आली होती. शहरी भागात इंधनाचे इतर स्रोत जसे लाकूड, गोवऱ्या व इतर उपलब्ध नसल्याचे कारण देत इतकी वर्षे शहरी नागरिकांसाठी जादा केरोसिन वाटप केले जात होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दोन्ही भागात समान केरोसिन वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, राज्यालासध्या केंद्र सरकारकडून एकूण मागणीच्या केवळ २८ टक्केचकेरोसिन मिळते. राज्याची मागणी मासिक एक लाख ७७ हजार किलो लिटरची असून प्रत्यक्षात ४६ हजार किलोलिटरच केरोसिन मिळते. (विशेष प्रतिनिधी)