शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची साई पक्षाला महापौरपदाची आॅफर

By admin | Updated: March 15, 2017 02:32 IST

भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या साई पक्षाला महापौरपद किंवा अन्य महत्वाची पदे मिळत नसल्याने त्या पक्षाची होणारी घालमेल ओळखून शिवसेनेने त्या पक्षाला

उल्हासनगर : भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या साई पक्षाला महापौरपद किंवा अन्य महत्वाची पदे मिळत नसल्याने त्या पक्षाची होणारी घालमेल ओळखून शिवसेनेने त्या पक्षाला महापौरपदाची आॅफर देत भाजपाची कोंडी केली आहे. साई पक्षाने पाठिंबा देऊनही महापौर भाजपाचाच असेल, असे त्या पक्षाने सांगितले आहे आणि तेच पद हवे असल्याचे ओळखून शिवसेनेने त्याची आॅफर दिल्याने साई पक्षाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पालिकेत सत्तेसाठी ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपाचे ३३ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेकडे रिपाइं व पीआरपीच्या तीन तीन नगरसेवकांसह २८ नगरसेवक आहेत. साई पक्षाचे ११ नगरसेवक आहेत. ते भाजपासोबत गेले तर भाजपाची सदस्यसंख्या ४४ होत आणि शिवसेनेसोबत गेले तर ३९ होते. त्यामुळे साई पक्षाचे महत्व कमी करण्याची भाषा करत भाजपा आणि शिवसेनेनेच त्या पक्षाचे महत्व वाढवल्याने साई पक्षावरून युतीतच रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या एका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांनीही साई पक्षाला पाठिंबा द्यावा, असे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवजयंतीनंतर या महायुतीची घोषणा करण्यात येईल, असे संकेत शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी दिले आहेत. त्याचवेळी महापौर निवडीला २० दिवस वेळ असल्याचे सूचक वक्तव्य साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी केल्याने मोठया प्रमाणात घोडेबाजाराची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपाचे मास्टरमाइंड प्रकाश मखिजा, प्रदीप रामचंदानी, जमनुदास पुरस्वानी, महेश सुखरामणी आदींनी बिनशर्त पाठिंब्यासाठी साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांचे मन वळवले होते. विकासाच्या मुद्दयावर इदनानी यांनी एका आठवड्यात दोन वेळा मुख्यमंत्र्याची भेटही घेतली होती. पण पद मिळत नसल्याची त्यांची अस्वस्थता लपत नव्हती. मध्यंतरी भाजपा-शिवसेना एकत्र येतील. मुंबई-ठाण्यात ज्याप्रमाणे भाजपाने बिनशर्त पाठिंबा दिला, तसा शिवसेनेने उल्हासनगरात द्यावा, असे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली होती. त्यातून साई पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले जाईल, असेही संकेत दिले जात होते. मात्र शिवसेनेने महापौरपदाचा आपला दावा अचानक सोडून साई पक्षाला पाठिंबा देण्याची केळी खेळल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. हाताशी आलेली सत्ता टिकवायची असेल तर त्यांना शिवसेनेसोबत वाटाघाटी करण्यावाचून सत्तेतील वाटा देण्यावाचून पर्याय उरलेला नाही, हेच या खेळीतून स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)