शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला मदत हवी तर ‘अडचण’ नको

By admin | Updated: October 6, 2014 05:27 IST

महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून काही मदत हवी असेल तर मला कोणतीही ‘अडचण’ नको, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यात केले

मुंबई : महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून काही मदत हवी असेल तर मला कोणतीही ‘अडचण’ नको, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यात केले. ‘अडचण’ या शब्दामध्ये मोदींना ‘बिगर भाजपा’ सरकार महाराष्ट्रात सत्तेवर बसवू नका, असे सुचवायचे आहे. प्रजासत्ताक भारतात वेगवेगळ््या राज्यांमध्ये वेगवेगळ््या पक्षांची सरकारे असली तरी केंद्र सरकारने सापत्न वागणूक देऊ नये, हे अभिप्रेत आहे व तशी पक्षपात न करण्याची शपथ पंतप्रधान घेतात. त्यामुळे ‘अडचण’ हा शब्द ही मोदींचा हा गर्भींत इशारा असेल तर त्यामुळे त्यांचीच अडचण होऊ शकते.केंद्रात एका पक्षाचे सरकार असो की आघाडीचे, मात्र राज्य सरकारांना निधी मंजूर करताना तेथे कुठल्या पक्षाचे सरकार आहे व ते केंद्र सरकारच्या विचारधारेशी मिळत्याजुळत्या विचारसरणीचे आहे किंवा कसे याचा विचार करून मदत दिली जात नाही. शिवाय केंद्र सरकार राज्य सरकारांना जेव्हा निधी देते तेव्हा उपकार करीत नाही. राज्यांमधून गोळा होणाऱ्या वेगवेगळ््या करांच्या रकमेतून केंद्र सरकार राज्यांना निधी देते. महाराष्ट्रातून दरवर्षी ८० हजार कोटी रुपये आयकरातून जमा होतात. महाराष्ट्रातून जेवढा पैसा कररूपाने जमा होतो त्या तुलनेत फारच कमी रक्कम महाराष्ट्राला मिळत असल्याची तक्रार शिवसेनेपासून अनेक पक्ष करीत असताना थेट पंतप्रधानांनी आपल्या पक्षाचे सरकार आणा तरच मदत मिळेल, असा गर्भीत इशारा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ दिली जाते तेव्हा कुणाबरोबर पक्षपात करणार नाही, अशी शपथ घेतली जाते. त्यामुळे केंद्राकडून महाराष्ट्राला मदत मिळण्यात ‘अडचण’ नको हे मोदी यांचे विधान म्हणजे पक्षपात न करण्याच्या शपथेचा भंग आहे, हे मोदींना ज्ञात नसावे का, असा सवाल उपस्थित होतो. (विशेष प्रतिनिधी)