शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

मागेल त्याला नाही, तर मिळेल त्याला शेततळे

By admin | Updated: May 14, 2016 00:30 IST

‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शेततळ्यासाठी असलेले अवघे पन्नास हजार रुपये अनुदान व प्रत्येक तालुक्याला दिलेली उद्दिष्ट तसेच याच्या अटी

घोडेगाव : ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने सुरू केली आहे. मात्र शेततळ्यासाठी असलेले अवघे पन्नास हजार रुपये अनुदान व प्रत्येक तालुक्याला दिलेली उद्दिष्ट तसेच याच्या अटी व शर्ती पाहिल्या असता ‘मिळेल त्याला शेततळे’ असे नाव या योजनेचे ठेवले पाहिजे, अशी टीका विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आयोजित जलयुक्त शिवार अभियान व टंचाई आढावा बैठकीत केली. आंबेगाव तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातून १३ गावांमध्ये कामे सुरू आहेत. या गावातील कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच तालुक्यात दोन टँकर सुरू असून, अजून सहा टँकरची मागणी झाली आहे. नुकतेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळात तालुक्यात लोणी, धामणी, पहाडदरा, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर या सहा गावांचा समावेश होतो. येथील लोकांना शासन देणार असल्याच्या सुविधांची चर्चा झाली.या वेळी प्रांत अधिकारी कल्याणराव पांढरे, सभापती जयश्री डोके, उपसभापती सुभाष तळपे, समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील, एस.बी. देवडे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मगर, आंबेगाव तहसीलदार बी. जी. गोरे, शिरूर तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, कृषी अधिकारी संजय विश्वासराव, संजय पिंगट, पंचायत समिती सदस्य कैलासबुवा काळे, संजय गवारी, खंडू पारधी, सुषमा शिंदे, अनिता निघोट, प्रियंका लोखंडे, मालिनी भोर, रेवती वाडेकर, प्रकाश घोलप इत्यादी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले, मागेल त्याला शेततळे या योजनेत शासनाने घातलेल्या अटी किचकट आहेत. शेततळे घेण्यासाठी संबंधित गाव पाच वर्षात एक वर्ष पन्नास टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेले असावे व लाभार्थ्याकडे कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील फक्त ५५ गावे आली आहेत. येथील ४० लाभार्थ्यांनी अर्ज केले होते मात्र अवघे १६ लाभार्थी पात्र झाले आहेत. त्यामुळे मागेल त्याला शेततळे ही शासनाची योजना फसवी असून त्याला नाव ‘मिळेल त्याला शेततळे’ असे दिले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.