शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला निर्णय महागात पडणार तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2016 05:20 IST

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अतिशय साहसी पाऊल उचलले आहे; मात्र त्यात धोकेही भयावह आहेत. पहिला धोका हा आहे की

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने अतिशय साहसी पाऊल उचलले आहे; मात्र त्यात धोकेही भयावह आहेत. पहिला धोका हा आहे की, नोट बदलण्यासाठी देशातील सुमारे १२० कोटी लोक अतिशय त्रस्त झाले आहेत. बँका आणि एटीएम मशीनवर लागलेल्या रांगांमुळे लोकांना दम लागला आहे. नव्या नोटांच्या तुटवड्यामुळे काही लोकांचा जीव गेला. अनेकांवर उपासमारीची पाळी आली. अनेकांच्या विवाहप्रसंगी वातावरण दु:खात पालटून गेले. आनंदावर विरजण पडले. अनेकांची दुकाने बंद पडली. लाखो गावांमध्ये एकही बँक नाही. ज्यांनी घाम गाळून मोठी कमाई केली. त्यांचीही झोप उडाली आहे. काहींना हृदयविकाराचे झटके आले. गरीब, ग्रामीण आणि कष्टकरी लोकांवरील संकट दूर व्हावे यासाठी आम्ही आमच्या राज्यांमध्ये जुन्या नोटाच चालवू, असे बडे नेते म्हणत आहेत. बिहार आणि मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये भुकेल्या ग्रामीण मजुरांनी धान्याची दुकाने लुटली. येत्या दोन- तीन दिवसांमध्ये लोकांच्या अडचणी दूर होतील, असा दावा सरकारने यापूर्वी केला आहे, तथापि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएम मशीन योग्यरीत्या चालविण्यासाठी आणखी १५-२० दिवस लागतील असे फर्मान सोडले आहे. ज्या लाखो गाव- खेड्यांमध्ये मशीन आणि बँका नाहीत तेथील नागरिक काय करतील? असा माझा सवाल आहे. ज्यांनी बँकांचे तोंडही पाहिले नाही, अशा लोकांची अडचण तर आणखी वाढणार आहे. हा त्रास या सरकारला खड्ड्यात तर नाही ना घालणार? देशाच्या १२० कोटी लोकांना या ‘काळा पैसा’ बाहेर काढण्याच्या योजनेचा नेमका कोणता फायदा होईल, हा खरा प्रश्न आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल? त्यांचा ५०० चा नोट १००० मध्ये चालेल? नाही. त्यांच्या वाट्याला केवळ दु:ख आणि अडचणीच येत आहेत. ते देशभक्त आहेत. ते सरकारला साथ देत आहेत. त्यांनी तसे केलेही पाहिजे. हेच लोक रांगेल लागून मतदान करायला जात असतात. ज्यांच्याकडे काळ्या पैशांचा ढीग जमलेला आहे, ते लोक मतदानासाठी कधी रांगेत उभे राहात नाहीत. नेते, दहशतवादी आणि तस्करांसोबतच या ‘काळ्या धनिकां’नी आपला पैसा अनेक व्यवसायांमध्ये गुंतविलेला आहे. त्यांना पकडण्याचा कोणताही उपाय सरकारकडे असेल असे वाटत नाही. ज्या सर्वसामान्य जनतेच्या मतांवर हे सरकार स्थापन झाले आहे, त्या लोकांना संताप अनावर होणार नाही म्हणजे झाले. (लेखक ज्येष्ठ हिंदी पत्रकार आहेत.)