शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

साई संस्थानवर आयएएस अधिकारी!

By admin | Updated: February 18, 2017 04:45 IST

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) आय.ए.एस. अधिकाऱ्यांची १५ मार्च पूर्वी नेमणूक करावी

औरंगाबाद/ शिर्डी : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) आय.ए.एस. अधिकाऱ्यांची १५ मार्च पूर्वी नेमणूक करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिला आहे. साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी जगभरातून दरवर्षी लाखो भाविक येत असतात. भक्तांच्या सोईसाठी संस्थानने देणगीदारांच्या पैशातून भक्तनिवास, प्रसादालय, रूग्णालय उभारले आहेत. मात्र, पाच हजार कर्मचारी, सतराशे कोटींच्या ठेवी असताना येथे पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता यावी, यासाठी राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर व संदीप कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती़ न्यायमूर्ती के. यु. चांदीवाल व व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने २ मे २०१४ रोजी या याचिकेवर राज्य सरकारला पंचेचाळीस दिवसात संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आय. ए. एस. अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले होते़यावर महाराष्ट्र शासनाने खंडपीठाच्या निकाला विरूद्ध सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती जे.एस़ केहर, न्या. एऩ व्ही़ रामन्ना, न्या. डी़ वाय़ चंद्रचुड व न्या. संजय कौल यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. तेव्हा येत्या १५ मार्च २०१७ पूर्वी संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आय. ए. एस. नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले़ याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड़ प्रज्ञा तळेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)शिर्डी संस्थानच्या कार्यकारी अधिकारी पदी उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी असून सुरेश हावरे यांच्या अध्यक्षतेखाली शासननियुक्त संचालक मंडळ कार्यरत आहे.