शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

एचआयव्हीग्रस्त मातांसाठी 'आई' योजना

By admin | Updated: July 13, 2014 21:39 IST

राज्यातील पहिला प्रयोग : कर्मचारीच राबवितात योजना

बुलडाणा : प्रवास खर्च झेपत नसल्याच्या कारणास्तव, एचआयव्हीग्रस्त माता त्यांच्या मुलांना तपासणीसाठी घेऊन येण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र बदलण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात 'आई' योजना राबविली जात आहे. अशी योजना राबविणारा बुलडाणा हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे.एचआयव्हीचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन वेगवेगळया योजना राबवित असून, या आजाराची भीती दूर करण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. तरीदेखील एचआयव्हीग्रस्तांचे प्रमाण चिंताजनक आहे. यामध्ये गर्भवती मातांचाही समावेश आहे. ज्या गर्भवती माता 'पॉझिटिव्ह' म्हणजेच एचआयव्हीने बाधीत आहेत, अशा मातांनी जन्माला घातलेल्या बाळांना एचआयव्हीची लागण झाली आहे का, या शंकेचे निरसन करण्य़ासाठी, अशा बालकांची नियमीत तपासणी करावी लागते. बाळाच्या जन्मानंतर सहा आठवडे, सहा महिने, १२ महिने व १८ महिन्यानंतर ही तपासणी होते. या तपासणीसाठी बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा व खामगाव ही दोन केंद्रे आहेत. केंद्रात येण्याजाण्यासाठी एचआयव्हीग्रस्त मातांना प्रवासखर्च स्वत: करावा लागतो. अशा मातांमध्ये सर्वाधीक प्रमाण गरीब घरातील स्त्रियांचे असल्याने, त्यांना प्रवास खर्च झेपत नाही व त्यामुळे त्या बालकांना तपासणीला आणण्यात टाळाटाळ करतात. ही बाब बुलडाणा येथील जिल्हा एडस् नियंत्रण विभागातील पर्यवेक्षक गजानन देशमुख यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी अशा मातांचा प्रवासखर्च कार्यालयाने करावा, अशी सूचना मांडली. शासकीय नियमानुसार असा खर्च करण्याची कुठलीही तरतुद नसल्याने, देशमुख यांनी सर्व सहकार्‍यांना रोज एक रूपया देण्याची विनंती केली. जिल्हा एडस् नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाले यांनाही ही कल्पना आवडली व त्यांनी देशमुख यांना प्रोत्साहन दिले. जिल्हाभरातील सर्व ४0 कर्मचार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, दर महिन्याला १ हजार २00 रूपये जमा होऊ लागले आहेत. या निधीमधून अशा गरजू मातांना तपासणीसाठी येण्याचा प्रवास खर्च देण्यास सुरवात करण्यात आली. जुलै २0१३ पासुन सुरू केलेली ही योजना आता एक वर्षाची झाली असून, जिलतील २३ एचआयव्हीग्रस्त माता या योजनेचा लाभ घेत आहेत. शासकीय कर्मचार्‍यांनी स्वखर्चातून सुरू केलेला हा उपक्रम राज्यासाठी पथदर्शक असाच ठरला आहे. ** एडस् संदर्भात संपूर्ण जिल्हाभरात जनजागृती अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत उपचाराच्या पद्धतीपासून, जीवनाला आधार देण्यापर्यंत जिल्हा एडस् नियंत्रण केंद्राचे कर्मचारी काम करतात. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात 'सन २0१५ पर्यंत शून्य गाठायचे आहे' ही संकल्पना समोर ठेवून एडस् नियंत्रणासाठी उद्दिष्ट ठरवून दिले आहे. ह्यआईह्ण सारख्या उपक्रमातून त्याच दिशेने एक प्रामाणीक प्रयत्न होत आहे.