शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

‘आय लव्ह यू कोणी म्हणायचे?’

By admin | Updated: January 24, 2017 03:39 IST

सध्या सगळ्या गंमतीच्याच गोष्टी सुरु आहेत. दोघांसमोर मोठा प्रश्न पडलाय ‘आय लव्ह यू’ कोणी म्हणायचे?... आपण अजृून

मुंबई : सध्या सगळ्या गंमतीच्याच गोष्टी सुरु आहेत. दोघांसमोर मोठा प्रश्न पडलाय ‘आय लव्ह यू’ कोणी म्हणायचे?... आपण अजृून कुंपणावर आहोत, इकडे की तिकडे ठरलेलं नाही...त्यामुळे दोन दिवस जरा शांत राहा. २६ तारखेला मी सविस्तर बोलणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई महापालिका निवडणुकीत युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार, याबाबत मेळाव्यातही उत्सुकता होती. सध्या दोन्ही पक्षात रंगलेल्या खेळाचे खुमासदार वर्णन करताना उद्धव म्हणाले, नेमके कुणी ‘आय लव्ह यू म्हणायचे’ असा मोठा प्रश्न सध्या आहे. आज बाळासाहेबांचा जन्मदिन त्यामुळे यावर आज बोलणार नाही. २६ जानेवारी रोजी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात या सर्वांचा सविस्तर समाचार घेईन. सध्या आपण कुंपणावर आहोत, इकडे का तिकडे ठरलेले नाही. त्यामुळे दोन दिवस वाट पाहू’ असे सूचक उद्गार उद्धव यांनी काढत . शिवसैनिकांना तूर्तास संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सध्या आपण इतरजण आपल्यासोबत वागताना काय काय नाटकं करत आहेत, हे बघून घेऊ. आपण एका निर्णायक टप्प्यावर उभे आहोत. या टप्प्यावर मराठी माणसाने एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. एकजुटीने लढलो नाही तर आपले तुकडे केले जातील. आता पुढे कसे जायचे, हा प्रश्न निश्चितच आहे. मात्र, तुम्ही माझ्यासोबत असाल तर मला कोणताही चिंता नाही, असे उद्धव यांनी सांगितले. मात्र, ज्यांचा माझ्या नेतृत्वावर विश्वास नाही त्यांनी खुशाल बाहेरची वाट पकडावी. मी निष्ठावंतांना घेऊन पुढे जाईन, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. (प्रतिनिधी)