शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मी काँग्रेस सोडतोय ही निव्वळ अफवा - नारायण राणे

By admin | Updated: March 23, 2017 11:14 IST

मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 23 - मुख्यमंत्र्यांना भेटलो याचा अर्थ पक्षांतर करतो असा होत नाही. काँग्रेसमधल्याच काही लोकांनी माझ्या पक्षांतराची बातमी पसरवली आहे. मी काँग्रेसमध्येच आहे. पक्षांतर करतोय ही निव्वळ अफवा असे सांगत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांचे खंडन केले. काँग्रेसमध्ये न्याय मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलल जातेय असा आरोप त्यांनी केला.
 
मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे शिवसेना-भाजपाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नारायणे राणेंची काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने ते पक्ष बदल करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. 
 
अलीकडेच नारायण राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर कडाडून टीका करत काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. नारायण राणेंना शिवसेनेत प्रवेश द्यायचा की, नाही यावर शिवसेनेत मंथन सुरु असल्याचे वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले होते. 2004 मध्ये नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते. 
 
उद्धव ठाकरेंवर अत्यंत बोच-या शब्दात टीका केली होती. त्यामुळे राणेंना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यासंबंधी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. कोकणात राणेंशी पंगा घेऊन शिवसेना वाढवणा-या नेत्यांचाही शिवसेनेला विचार करावा लागणार आहे तसेच कोकणात आता शिवसेनेने  आपला गमावलेला जनाधार पुन्हा भक्कम केला आहे त्यामुळे राणेंची उपयुक्तता किती राहील यावर मंथन सुरु आहे. 
 
भाजपाही नारायण राणेंबद्दल अनुकूल आहे. कोकणात भाजपालाही राणेंसारखा भक्कम नेता हवा आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नावरुन परत येताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी एकत्र प्रवास केला होता याकडेही राजकीय विश्लेषकांनी लक्ष वेधले आहे. नारायण राणेंनी मागच्या दोन एक वर्षात सातत्याने काँग्रेसवर टीका केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. स्वत: नारायण राणेंनी आपण काँग्रेसमध्येच आहोत. शिवसेना किंवा भाजपाच्या कुठल्याही नेत्याला भेटलो नसल्याचे सांगितले आहे.