शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
3
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
4
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
5
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
6
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
7
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
8
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
9
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
10
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
11
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
12
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
13
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
14
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
15
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
16
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
17
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
18
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
19
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
20
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?

महिला पोलिसावर पतीचा चाकूहल्ला

By admin | Updated: October 19, 2016 02:16 IST

चारकोप परिसरात महिला पोलिसावर पतीनेच चाकूने जीवघेणा हल्ला चढविण्याची घटना घडली.

मुंबई : चारकोप परिसरात महिला पोलिसावर पतीनेच चाकूने जीवघेणा हल्ला चढविण्याची घटना घडली. मंगळवारी पहाटे हा प्रकार घडला. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी या महिलेच्या पतीला अटक केली आहे. संगीता सुर्वे अहिरेकर (२६) असे जखमी महिला पोलिसाचे नाव आहे. त्या अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. चारकोपच्या सह्याद्रीनगरमधील सदगुरू अपार्टमेंटमध्ये अन्य तीन महिला पोलीस शिपाईंसोबत भाडे तत्त्वावर राहतात. चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास संगीता यांचा पती प्रीतम अहिरेकर या ठिकाणी आला. त्याने दरवाजा ठोठावला तेव्हा रूम पार्टनरने दरवाजा उघडला. तेव्हा ‘माझ्या बायकोशी मला बोलायचे आहे’ असे त्याने सांगितले. मात्र हा नेमका कोणत्या उद्देशाने आला याची काहीच माहिती नसल्याने त्याला घरात येण्याची परवानगी दिली. तसेच पती-पत्नीच्या खासगी विषयात आपण नको पडायला असा विचार करत बाकी महिला आपल्या कामाला लागल्या. काही वेळ या दोघा नवरा-बायकोने आपापसात चर्चा केली आणि अचानक त्यांच्यात भांडण सुरू झाले. तेव्हा संगीता यांच्या पतीने सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. तेव्हा वेदनेने ओरडणाऱ्या संगीता यांचा आवाज ऐकून त्यांना वाचविण्यासाठी रूम पार्टनर माळी आणि सुतार धावून गेल्या. त्यांनी आरडाओरड सुरू केली तसेच हल्लेखोर पतीला अडवून त्याला पकडले. त्यानंतर लगेचच पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानुसार चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रीतमला अटक केली. प्रीतम हा ‘बेस्ट’मध्ये कारकून म्हणून कार्यरत असल्याचे चारकोप पोलिसांनी सांगितले. संगीता यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये संगीताचे प्रीतमसोबत लग्न झाले. मात्र त्यांच्यात काही खासगी कारणावरून सतत वाद सुरू होते. याला कंटाळून संगीता पतीपासून वेगळ्या राहत होत्या. (प्रतिनिधी)