शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात त्रिशंकू विधानसभा शक्य

By admin | Updated: February 6, 2017 01:55 IST

मतदारसंघातील राजकीय वारे आणि मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण करता गोव्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता राजकीय अभ्यासकांना वाटते.

पणजी : मतदारसंघातील राजकीय वारे आणि मतदानाच्या टक्केवारीचे विश्लेषण करता गोव्यात त्रिशंकू विधानसभेची शक्यता राजकीय अभ्यासकांना वाटते. त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास सरकार स्थापनेसाठी मगोप किंवा अपक्षांचा आधार सत्ता स्थापन करण्याचा दावा करणाऱ्या पक्षांना घ्यावा लागेल. भाजपा, काँग्रेस व ‘आप’ने स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला आहे.उत्स्फूर्त मतदानाचा आपल्यालाच लाभ होईल, असे तिन्ही पक्ष मानतात. मगोपने ८ ते १२ जागा आपल्याला मिळतील, असे सांगितले. भाजपाचे सर्व ३६ उमेदवार तसेच मतदारसंघ मंडल अध्यक्षांची केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी बैठक घेतली. कोअर कमिटीने या सर्वांशी संवाद साधून अहवाल घेतला. भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास या अहवालाअंती या समितीने काढला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ जागा मिळतील, असा समितीचा होरा आहे. त्रिशंकू विधानसभेची शक्यता असताना आप वगळता कोणीही आपले धोरण स्पष्ट करायला तयार नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही किंवा कोणाकडून घेणारही नाही. त्यापेक्षा विरोधात बसणे पसंत करू, असे आपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दिनेश वाघेला यांनी सांगितले.भाजपाने ३६ जागा लढविल्या. नावेली व प्रियोळमध्ये अपक्षांना पाठिंबा दिला. काँग्रेसने ३७ जागांवर उमेदवार उभे केले होते. पर्वरी व पणजीत त्यांनी अनुक्रमे अपक्ष रोहन खंवटे व युगोचे बाबूश मोन्सेरात यांना समर्थन दिले. ‘मगोप’, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना युतीने २४ जागा लढविल्या तर आम आदमी पक्षाने ३९ जागांवर उमेदवार उभे केले होते. बदलाचे वारे नव्हे - भाजपा भाजपाच्या मतदान केंद्र व्यवस्थापनामुळेच विक्रमी मतदान झालेले आहे. हे मतदान प्रस्थापितांविरुध्द आहे किंवा बदलाचे वारे आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे मत पक्षनेते सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केले.पैशांचा प्रचंड वापर- आप‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्वीस गोम्स यांच्या मते ‘सायलंट’ मतदान झालेले असून ते ‘आप’साठी फायदेशीरच आहे. त्रिशंकू विधानसभेची शक्यता त्यांनी फेटाळली. त्याचबरोबर या निवडणुकीत अन्य राजकीय पक्षांनी तसेच अपक्षांनी पैशांचा प्रचंड वापर केला, असा आरोप त्यांनी केला.मगोपला ८ ते १२ जागा - मामलेदारमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ८ ते १२ जागा मिळतील, असे मगोपचे सरचिटणीस आ. लवू मामलेदार यांनी सांगितले. फोंडा, सावर्डे, मडकई, शिरोडा, प्रियोळ, दाबोळी, डिचोली व पेडणे या आठ जागा तर निश्चितच मिळतील, असे ते म्हणाले. बहुमत मिळेल - काँग्रेसत्रिशंकू विधानसभा स्थापन होऊच शकत नाही. आम्हालाच स्पष्ट बहुमत मिळेल. हे बदलासाठीचे मतदान होते. आम्ही ६0 टक्के नवे चेहरे दिले. त्याचा फायदा होईल, असे काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस गिरीश चोडणकर यांनी सांगितले.