शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

हजारावर शेतकऱ्यांना दीड कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: November 13, 2015 00:39 IST

शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर समिती गठित करून सावकारग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेत प्रकरणे

वर्धा : शासनाने विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर समिती गठित करून सावकारग्रस्त शेतकऱ्यांची माहिती घेत प्रकरणे सादर करण्यात आली होती. शासनाच्या या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील हजारावर शेतकऱ्यांना मिळणार असून तब्बल दीड कोटी रुपयांवर कर्ज माफ होणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी हंगामाच्या तोंडावर कर्ज काढावे लागते. बॅँकांकडून घेतलेल्या पीक कर्जातून गरज न भागल्यास आणि थकबाकीदार राहिल्यास घरातील सोने, चांदीचा ऐवज घेऊन शेतकरी सावकाराचे दार ठोठावतात. दरवर्षी अनेक शेतकरी सावकारांकडून कर्जाची उचल करतात. बरेचदा शेतीतील उत्पन्न जेमतेम असल्यास सावकाराकडे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिनेही सोडविता येत नाही. परिणामी, शेतकऱ्यांच्या अडचणीत भरच पडते. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर पार पडलेल्या बैठकीत १ हजार ६५ प्रकरणांना मंजुरी देत १ कोटी ५६ लाख ५ हजार ३४७ रुपयांची कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी पोलीस गृहअधीक्षक किल्लेकर, जिल्हा उपनिबंधक तलमले, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांच्यासह सहायक निबंधक सहकारी संस्था आदी उपस्थित होते. याबाबतची यादी संकेतस्थळावरही उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)