शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हक्क आयोगाने दिले भरपाईचे आदेश

By admin | Updated: January 20, 2017 00:57 IST

नातेवाइकांना न कळविता तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने राज्य मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली.

पिंपरी : नातेवाइकांना न कळविता तरुणाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी ह्युमन राइट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संस्थेने राज्य मानवाधिकार संघटनेकडे धाव घेतली. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. त्यांच्यावर संबंधित खात्याने कारवाई केली. राज्याच्या गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, तसेच आरोग्य विभागाचे मुख्य सचिव मंत्रालय मुंबई यांनी एकत्रित अथवा स्वतंत्रपणे मृत मुलाचे वडील सुब्रह्मण्यम स्वामी यांना भरपाई म्हणून १५ लाख रुपये संबंधित खात्यामार्फत द्यावेत, अशी शिफारस राज्य मानवाधिकार आयोगाने केली आहे.राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम. ए. सय्यद यांनी २८ नोव्हेंबर २०१७ ला दिलेल्या आदेशात मृत मुलाच्या वडिलांना १३ लाख रुपये द्यावेत, अशी शिफारस केली आहे. त्यासाठी या आदेशाच्या दिनांकापासून सहा आठवड्याची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत भरपाईची रक्कम न दिल्यास दरसाल दरशेकडा १२.५० टक्के दराने व्याजासह रक्कम द्यावी, असेही त्यात नमूद केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, देहूरोड येथील कन्हैया ऊर्फ सूर्या या महाविद्यालयीन तरुणाच्या मृतदेहाची पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने परस्पर विल्हेवाट लावली. १ आॅक्टोबर २०१० ला देहूरोड येथे राहणाऱ्या कन्हैया या तरुणाचा मृतदेह तळेगावातील आंबी नदीपात्रात आढळून आला. मृतदेह सडलेला असल्याने त्याची विल्हेवाट लावली, असे तळेगाव दाभाडे पोलिसांनी कन्हैयाच्या नातेवाइकांना कळविले. मात्र, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याने नातेवाइकांचा संशय बळावला. कन्हैयाच्या वडिलांनी याप्रकरणी पाठपुरावा केला. तहसीलदारांना विनंती करून कन्हैयाचा मृतदेह उकरून काढण्यात आला. तो विच्छेदनासाठी पुन्हा ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. त्या वेळी डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे कारण पुढे आले. परंतु तळेगाव दाभाडे येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माधव अडेलू वाघमारे यांनी पाण्यात बडून मृत्यू झाल्याचे कारण दिले होते. ही विसंगती लक्षात आली.(प्रतिनिधी)>तळेगाव दाभाडे येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी माधव अडेलू वाघमारे यांनी पाण्यात बडून मृत्यू झाल्याचे कारण दिले होते. ही विसंगती लक्षात आली. शिवाय पोलिसांना कन्हैयाच्या खिशात मोबाइल मिळाला असताना, त्यांनी ओळख पटविण्यासाठी वेळीच नातेवाइकांना बोलावले नव्हते. पोलीस अधिकारी महादेव मोरे यांचीही कार्यपद्धती संशयास्पद वाटली. त्यांच्याबद्दल तक्रार दिल्यानंतर कारवाई झाली. दरम्यान, मोरे यांचे १९ जानेवारी २०१४ ला निधन झाले.