शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

कसा राहणार पोलिसांवर भरोसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2017 20:59 IST

मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - मागील वर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील पोलीस प्रशासनाने यातून बहुतेक धडा घेतलेला नाही. म्हणूनच की काय भरोसा सेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी अवघ्या तीन जणांचा स्टाफकार्यरत आहे. विशेष म्हणजे शहरात लाखो ज्येष्ठ नागरिक असताना मागील सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजारांच्या आसपासच नागरिकांचे कार्ड तयार करण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे विचारणा केली होती. भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले कार्ड तसेच दामिनी पथकाला देण्यात आलेल्या सुविधा इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी भरोसा सेलमध्ये केवळ एक अधिकारी व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. भरोसा सेलतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विशेष कार्ड देण्यात येते. १ जानेवारी २०१२ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत पोलीस विभागातर्फे केवळ ३,६६२ ज्येष्ठ नागरिक कार्ड वितरित करण्यात आले. तर या कालावधीत केवळ ३७२ नागरिकांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. मागील पाच वर्षात चक्क ३८ ज्येष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली. तर फसवणूक व मारहाणीचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला होता.अशा स्थितीत माहितीच्या अधिकारातील ही आकडेवारी पोलिसांच्या दाव्यांची पोलखोल करणारीच आहे.दामिनी पथकासाठी केवळ चार गाड्यामहिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांमध्ये २०११ पासून विशेष पथक कार्यरत आहे. २०१६ साली याला दामिनी पथक असे नाव देण्यात आले. शहरात छेडखानी, महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने होत असतात. अशा घटना थांबविण्याची जबाबदारी दामिनी पथकावर आहे. हे पथक शहरभरात सातत्याने फिरतीवर राहणे अपेक्षित आहे. मात्र या पथकाकडे केवळ चार वाहने असून प्रत्येक गाडीवर चार व एका गाडीवर तीन असे केवळ १५ कर्मचारी याअंतर्गत कार्यरत आहे. १ जानेवारी २०१७ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत महिला व तरुणींची छेडखानी करणाऱ्या १,३५९ जणांवर कारवाई करण्यात आली.