शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कशी थांबेल वीजचोरी

By admin | Updated: January 20, 2015 01:20 IST

वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे.

हायकोर्टाची दखल : वीज गुन्ह्यांसाठी विदर्भात एकच पोलीस ठाणेनागपूर : वीज कायदा-२००३ अंतर्गत मोडणाऱ्या गुन्ह्यांसाठी संपूर्ण विदर्भात केवळ एकच पोलीस ठाणे आहे. नागपुरातील गड्डीगोदाम येथे महावितरण कार्यालयाच्या परिसरात हे पोलीस ठाणे आहे. यामुळे वीज चोरी व इतर गुन्ह्यांवर वचक कसा बसेल हा प्रश्न आहे. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन हे प्रकरण जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे. एका फौजदारी अर्जावरील सुनावणीदरम्यान याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. न्यायालयाने ही बाब गृह विभागाचे प्रधान सचिव व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्यापर्यंत पोहोचवून यासंदर्भात काय करता येईल याची माहिती घेण्याचे निर्देश दिले आहेत. सध्याच्या एकमेव पोलीस ठाण्यावर नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला या नऊ जिल्ह्यांचा भार आहे. नऊ जिल्ह्यातील वीजचोरीचे गुन्हे या पोलीस ठाण्यात नोंदवले जातात. दर महिन्याला सरासरी २०० गुन्ह्यांची नोंद होते. धाड टाकून वीजचोरी पकडणे, घटनेचा पंचनामा करणे व जप्ती कारवाई करणे या जबाबदाऱ्या वीज अधिकाऱ्यांकडे आहेत. यानंतर ते वीज पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवतात. येथून वीज पोलीस ठाण्याचे कार्य सुरू होते. संबंधितावर गुन्हा नोंदवणे, आवश्यकता पडल्यास अटक करणे व शेवटी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे ही त्यांची कामे आहेत. तपास अधिकाऱ्याला दिलेल्या तारखेवर न्यायालयातही हजर रहावे लागते. कामाची ही काहिली अंगभर होत असल्याची तक्रार पोलीस नेहमीच करीत असतात. गुन्ह्यांचे प्रमाण पाहता प्रत्येक जिल्ह्यात एक पोलीस ठाणे आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)