शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत कर्ज फेडायचे कसे?

By admin | Updated: June 30, 2017 01:22 IST

शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत:

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांनी २०१६-१७मध्ये घेतलेल्या कर्जाची शुक्रवार, ३० जूनपर्यंत पूर्णत: परतफेड केली तर त्यांना २०१५-१६ या वर्षातील पूर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या २५ टक्के वा २५ हजार रुपये यातील जी रक्कम कमी असेल ती प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने शुक्रवारपर्यंत एकदम पैसा भरायचा कुठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ३० जूनची मुदत वाढवून, किमान १५ जुलैपर्यंत तरी करावी, अशी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या मुदतवाढीचा निर्णय सहकार विभागाने गुरुवार सायंकाळपर्यंत घेतलेला नव्हता. मुदतीच्या शेवटच्या दिवशी (३० जून) किती शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड केली जाते, याचा अभ्यास करून मुदतवाढ देण्याबाबतचा विचार केला जाईल, असे एका ज्येष्ठ मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कर्जमाफीचा शासकीय निर्णय २८ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला अन् ३० जूनपर्यंतची मुदत देण्यात आली. एवढा पैसा दोन दिवसांत उभारण्याची शेतकऱ्यांची आर्थिक कुवत नाही.आधारसंलग्न कर्जमाफी-या आधी २००९मध्ये दिलेल्या कृषी कर्जमाफीमध्ये अनेक घोटाळे झाले होते. बोगस लाभार्थी दाखवून पैसा उचलण्यात आला. यावेळी कर्जमाफीची रक्कम ही आधार संलग्न करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. सूत्रांनी सांगितले की, खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे.‘अवघ्या ८ हजार कोटींची कर्जमाफी’छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक चालविली आहे. कर्जमाफीसंदर्भात खाटे आकडे, जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या परिघाबाहेर फेकले गेले आहेत. कर्जमाफीसाठीच्या अटी व कालावधी पाहता प्रत्यक्षात अवघ्या ८ हजार कोटींचीच कर्जमाफी असल्याचा दावा काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.