शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

‘मिहान’मध्ये विजेचा नेमका दर किती?

By admin | Updated: November 24, 2014 01:23 IST

मिहानमध्ये सोमवारपासून प्रति युनिट ४.३० रुपये दराने वीज उपलब्ध होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले तर दुसरीकडे ‘एमएडीसी’ने ४.३९ रुपये

नागपूर : मिहानमध्ये सोमवारपासून प्रति युनिट ४.३० रुपये दराने वीज उपलब्ध होणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले तर दुसरीकडे ‘एमएडीसी’ने ४.३९ रुपये दराने वीज पुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मिहान-सेझमधील उद्योगांना नेमकी कोणत्या दराने वीज मिळेल, यावर उद्योजकांमध्ये संभ्रम पसरला आहे. वीज दरात प्रति युनिट ९ पैसे फरकाचा उद्योजकांना फटका बसणार आहे. एखाद्या उद्योगाला महिन्याला १० हजार युनिट वीज लागत असेल तर दरातील तफावतीमुळे त्यांची ९०० रुपयांची बचत होईल. त्यामुळे विजेचा नेमका दर किती हे आता एमएडीसीने जाहीर करावे आणि उद्योजकांमधील संभ्रम दूर करावा, असे मत उद्योजकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले. उद्योजकांना सोमवारपासून नव्हे तर शनिवार मध्यरात्रीपासून ४.३९ रुपये दराने वीज पुरवठा सुरू झाला आहे. तशा आशयाचे परिपत्रक राज्य वीज नियामक आयोगाने काढले आहे. पण गडकरी यांच्या वक्तव्यानंतर उद्योजकांना वीज प्रति युनिट ९ पैसे स्वस्त मिळत असेल तर त्याचे स्वागतच आहे. स्वस्तात वीज पुरवठा व्हावा, अशी उद्योजकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. रविवारी झालेल्या ‘वेद’च्या चर्चासत्रात शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकीकडे ‘एमएडीसी’चे दर आणि दुसरीकडे गडकरींनी सांगितलेले दर यापैकी नेमक्या कुठल्या भावाने वीज मिळेल, असा प्रश्न उपस्थित उद्योजकांना पडला. ९ पैशांचा फरक व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडवू शकतो, याची उद्योजकांना जाण आहे. गडकरींनी चुकीने ४.३९ ऐवजी ४.३० असे सांगितले असावे, असे उद्योजक म्हणाले. (प्रतिनिधी)